आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पांडुरंगरायांच्या पालखी सोहळ्याचे वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्यावतीने रांगोळीच्या पायघड्या, पुष्प सजावटीसह हरिनाम गजरात पंढरीकडे परतीचे प्रवासात जाताना पहिल्या मुक्कामात जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांनी पालखी सोहळ्याचे परंपरेने स्वागत व पाहुणचार केला.
याप्रसंगी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त माऊली जळगावकर महाराज, श्री पांडुरंगराय पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. नामदेव महाराज वासकर, प्रभू महाराज वासकर, पुजारी संदीप कुलकर्णी, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अँड विकास ढगे पाटील, माऊलींचे पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पुणे बार असोशिएशनचे अध्यक्ष अँड पांडुरंग थोरवे, पिंपरी चिंचवड बार असोशिएशनचे अध्यक्ष अँड नारायण रसाळ यांचे सह उपस्थित मान्यवरांचा सत्कार संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ, उपरणे देऊन करण्यात आला. यावेळी श्रींचे पादुकांची पूजा अँड विष्णू तापकीर , सुनीता तापकीर यांचे हस्ते झाली. सपत्नीक दर्शन घेऊन श्रींचे पादुका पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी खजिनदार दत्तात्रय गायकवाड, रमेश महाराज घोंगडे, राजेंद्र नाणेकर, काशिनाथ तापकीर, मनोहर भोसले, नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्वर घुंडरे, ज्ञानेश्वर गुळुंजकर उपस्थित होते.
पंढरपूर ते आळंदी श्रींचा पादुका पालखी सोहळा गेल्या १२ वर्षांपासून येत आहे. आळंदी ते पंढरपूर पांडुरंगाचा पादुका पालखी सोहळा हरिनाम गजरात परतीचे प्रवासात पायी जाताना मुक्कामी होता. दिंडीतील भाविक, वारकरी, दिंडेकरी, टाळकरी, विणेकरी पालखी मुक्कामी थोरल्या पादुका मंदिरात विसावले. यावेळी येथे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक, भाविक यांनी श्रींचे पादुकांचे दर्शन घेतले. पादुकाना पुष्पहार, तुळशीहार, श्रीफळ अर्पण करण्यात आले. श्रींची समाज आरती हरिनाम गजरात झाली. श्रीना महानेवैद्य झाला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांनी ट्रस्ट व भाविकांचे वतीने स्वागत केले. यावेळी भाविक व वारकरी यांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. अनुष्का केदार हिने लक्षवेधी रांगोळी रेखाटली. श्रींचे पादुका पालखी सोहळा पुढील प्रवासास हरिनाम गजरात भल्या पहाटे गुरुवारी ( दि. २४ ) मार्गस्थ झाला.