LATURMaharashtraMarathwada

लातुरात अग्नितांडव; सात वाहने, एकजण जळून खाक!

लातूर (गणेश मुंडे) – ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला डिझेलच्या टँकरने धडक दिल्याने डिझेलची टाकी फुटून लागलेल्या भीषण आगीत तब्बल सात वाहने जळून खाक झाली असून, काही प्रवासीदेखील होरपळले आहेत. या धडकेनंतर स्फोट होऊन मोठी आग भडकली होती. हा अपघात बुधवारी रात्री लातूर येथे घडला. या दुर्दैवी घटना एक जण जीवंत होरपळला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर १० ते १२ जण गंभीर जखमी झालेत. दरम्यान, खासगी कार, डिझेल, टँकर याच्यासह एसटी बसच आगीत जळून खाक झाली असून, या अपघातामुळे लातूर-नांदेड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे वळण रस्त्यावरुन वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याच अरुंद रस्त्यावर हा अपघात झाला. लातूरहून नांदेडच्या दिशेने जाणारा टँकर भातांगळीजवळ आला, तेव्हाच ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टरही याच मार्गावरून जात होता. यावेळी टँकरने ट्रॅक्टरला धडक दिली. यामुळे डिझेलच्या टँकरने अचानक पेट घेतला. यामुळे कमी जागेत जवळ आलेली वाहने एकापाठोपाठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

या वाहनांमध्ये ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर, डिझेलचा टँकर, दोन कार, कापसाची वाहतूक करणारा मोठा ट्रक, एसटी महामंडाळाची बस आणि ट्रॅक्टरचे हेड ट्रॉली नसलेले वाहन यांचा समावेश आहे. घटनेनंतर लगेचच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बाजूलाच असलेल्या मांजरा नदीपात्रातून पाण्याची सोय करण्यात आल्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यात यश आले. डिझेल टँकरला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानाची चांगलीच दमछाक झाली होती. त्यातच कापसाच्या गाठी वाहतूक करणारा ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ लागला. एसटी महामंडळची बस आणि दोन कार जागेवर जळून खाक झाल्या. बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. माहिती मिळताच आग्निशमन दल व लातूर ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्वतः पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी घटनास्थळी घाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. रात्री उशीरा आग आटोक्यात आली.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!