– संजय वडतकर यांच्या प्रयत्नातून सर्कलमध्ये विविध विकासकामे मार्गी
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – हिवरा आश्रम येथील प्रभाग दोनमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वडतकर यांच्या प्रयत्नातून व जिल्हा परिषदेच्या विविध निधीतून तब्बल १५ लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येऊन, त्याचे आज संजय वडतकर यांच्यासह सरपंच मनोहर गिर्हे, विवेकानंद आश्रमाचे माजी सचिव सदाशिव खाकरे यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते लोर्कापण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या १५ वित्त आयोग, जिल्हा परिषदस्तर जनसुविधा योजना आदी योजनांमधून तब्बल १५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेत, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वडतकर यांनी हिवरा आश्रम येथील प्रभाग क्रमांक दोनमध्ये मेहकर-चिखली रोड ते गणेशराव धोंगडे यांचे घर, खाकरे सर यांचे घर ते रुख्मिणी केमिकल इंडस्ट्रिज, लोखंडे यांचे घर ते गिरी यांचे घर, महादेव जटाळे यांचे घर ते रुख्मिणी केमिकल इंडस्ट्रिज असे २४० मीटरचे सिमेंट काँक्रेटचे रस्ते करण्यात आले आहेत.
या रस्त्याचे लोर्कापण माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर यांच्याहस्ते व हिवरा आश्रमचे सरपंच मनोहर गिर्हे, ग्रामपंचायत सदस्या सौ. मालता संजय वडतकर, सौ. अंतकला जामकर, योगेश देशमुख, ज्येष्ठ नागरिक तथा विवेकानंद आश्रमाचे माजी सचिव सदाशिव खाकरे, शिवदास सांभापुरे सर, संजय भारती सर, सज्जनसिंह राजपूत सर, अनिल बोरकर, किशोर मवाळ, पुरी सर, गणेश धोंडगे, शरद पागोरे, नंदू पागोरे, नंदू करे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. संजय वडतकर यांच्या जिल्हा परिषद सदस्यत्वाच्या कार्यकाळात त्यांच्या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागलेली आहेत.
————-