KARAJAT

गायरान जमिनीसह सरकारी जागेवरील अतिक्रमणे काढली जाणार!

कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील 33 गावातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे काढण्यासाठी कालबद्द नियोजन जाहीर केले असून, याबाबत आज पंचायत समिती सभागृहात ग्रामसेवक तलाठी यांची बैठक झाली.  सर्वोच्च न्यायालयाच्या २०११ च्या निकालाची अंमलबजावणी बरोबरच उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या अनुषगाने दिलेल्या कार्यवाहिच्या आदेशानव्ये आगामी काळात गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात येणार असून यापुढे या जागेवर पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत याची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

जनहित याचिका दोन ऑब्लिक 2022 मध्ये उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील आदेश दिनांक 6 ऑक्टोबर 2022 नुसार कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय व गायरान जमिनीवर असलेली अतिक्रमणे कालबद्ध कार्यक्रम आखून निष्कासित करणे आवश्यक आहे यासाठी तालुकास्तरीय समिती नियुक्त करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी उपविभागीय अधिकारी आहेत तर समितीमध्ये तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक नगरपंचायत चे मुख्याधिकारी व भूमिअभिलेख चे उपाध्यक्ष सदस्य आहेत सर्व शासकीय व गायरान जमिनीवर असलेली अतिक्रमणे निष्कर्षित करण्याबाबत कारवाई करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल दिनांक 20 डिसेंबर 22 पर्यंत कार्यालयात सादर करावयाचा आहे या दृष्टीने आज कर्जत पंचायत समिती या ठिकाणी नियोजन व आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने बैठक संपन्न झाली यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी उपस्थित तलाठी व ग्रामसेवक यांना योग्य त्या सूचना देत तारीख वार करावयाच्या कामाची माहिती दिली यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे गटविकास अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते.

दि ७ नोव्हे २२ रोजी बैठक घेऊन माहिती देणे दि १० नोव्हे २२ ते दि १२ नोव्हे २२ दरम्यान तहसीलदार यांनी अतिक्रमणे काढून घेण्याबाबत नोटीसी काढणे, दि १३ नोव्हे ते दि १४ नोव्हे सदर नोटिसा संबंधित व्यक्तींना दिल्याचा गोषवारा सादर करणे दि १७ नोव्हे ते दि २८ नोव्हे संबंधित अतिक्रमण धारक यांनी स्वतः अतिक्रमण काढून घेतल्या बाबतची माहिती घेणे दि १ डिसें ते दि १६ डिसें शासकीय अथवा गायरान जमिनीवरील अतिक्रमण स्वतः काढून घेतले नाही अशा गावांमध्ये सर्वात कमी अतिक्रमणे आहेत त्या गावापासून ती अतिक्रमणे निष्काशीत करण्याबाबत सदरील समिती वरील सर्व अधिकारी व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांच्यासह उपस्थित राहून कार्यवाही सुरू करणे दि १७ डिसें ते दि १८ डिसें या दिवशी विभागातील अतिक्रमणे काढण्यात आल्या बाबतचा अंतिम अहवाल प्रमाणपत्रासह सादर करणे. असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील पुढील गावात गायरान जमिनीवर अतिक्रमन केलेले असून, यामध्ये आखोणी, आंबी जळगाव, बेलगाव, भांबोरा, भोसे, बिटकेवाडी, चिलवडी, चापडगाव, दुर्गाव, गणेशवाडी, गुरवपिंपरी, जळगाव, करमणवाडी, करपडी, खंडाळा, खातगाव, खेड, कोपर्डी, कोरेगाव, माही, मिरजगाव, नागलवाडी, नांदगाव, निमगाव डाकू, पाटेवाडी, रवळगाव, रेहेकुरी, रुईगव्हाण, शिंदे, शीतपूर, टाकळी खंडेश्वरी, तरडगाव, थेरवडी, आदी 33 गावासह काही गावाची माहिती येणे बाकी आहे, या गावातील गायरान जमिनी वरील अतिक्रमणे हटविण्याबाबत नियोजन केेले जाणार आहे. तालुक्यातील गायरान जमीनच नसलेली गावे पुढील प्रमाणे वायसेवाडी, बाभुळगावदुमाला, देशमुखवाडी, कानगुडेवाडी, सोनाळवाडी, तोरकडवाडी, जळकेवाडी, दिघी, चिंचोली काळदाते, डिकसळ, शेगूड, डोंबाळवाडी, वडगाव तनपुरा, बहिरोबावाडी, कापरेवाडी, पाटेगाव, मलठण, औटेवाटी, सिद्धटेक, रुईगव्हाण, निंबे, नागापूर, माळेवाडी, चखालेवाडी, सुपेकरवाडी, तिखी, गोंदर्डी, राशीन, राऊकाळेवाडी, काळेवाडी, परीटवाडी, ताजु, ही गावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!