मेहकर (तालुका प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व संसदेने ज्यांना संसद महारत्न म्हणून गौरविलेले आहे, अशा आदर्श महिला खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गलिच्छ शब्द वापरून त्यांच्याविषयी गैरउदगार काढले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी मंत्री सत्तार यांच्या प्रतिमेला हिवरा आश्रम येथे आज (दि.८) सकाळी ९ वाजता जोडे हाणणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर यांनी कळवलेले आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा देऊळगावमाळी जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य संजय वडतकर यांनी सांगितले, की राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संसद महारत्न म्हणून गौरविलेल्या खासदार, पक्षाच्या नेत्या सौ. सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल गलिच्छ शब्दाचा उपयोग केला आहे. त्यांच्याविषयी गैरउदगार काढून त्यांचा अपमान केला आहे. राज्य सरकारने सत्तार यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ८ नोव्हेंबररोजी सकाळी ९ वाजता हिवरा आश्रम फाट्यावर सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी व नागरिकांनी, महिला-भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहनही संजय वडतकर यांनी केलेले आहे.
———-