आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील वडमुखवाडीतील प्रथापरंपरांचे पालन करीत सुरु असलेल्या काकडा आरतीत कार्तिकी एकादशी निमित्त कार्तिक स्नान, श्री पांडुरंगाची महापूजा, श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांचे हस्ते सपत्नीक महापूजा व महाप्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात काकडा आरती, महानैवेद्य वाढविण्यात आला. यावेळी काळुराम तापकीर,ज्ञानेश्वर तापकीर, मारुती तापकीर, अरुणा तापकीर, सरस्वती तापकीर,साधना तापकीर आदी मान्यवरांसह भाविक उपस्थित होते. वडमुखवाडीतील पांडुरंग मंदिरात गेल्या ५० वर्षां पासून काकडा आरतीची परंपरा असून ॲड. विष्णू तापकीर व त्यांचे पत्नी सुनीता तापकीर यांना कार्तिकी एकादशी निमित्त पूजेचा मान दिलेला आहे. धार्मिक मंगलमय वातावरणात काकडा आरती, महापूजा ,भाविकांचे दर्शन झाले.
आळंदी पंचक्रोशीत कार्तिक स्नान आणि काकडा भजन आरती निमित्त विविध गावांत उत्साहात कीर्तन, भजन, आरती, एकादशीनिमित्त फराळ महाप्रसाद वाटप सेवा उत्साहात झाली. यावेळी विणेकरी शंकर महाराज गिलबिले, पंडित महाराज तापकीर, राजाराम महाराज तापकीर, गणेश महाराज तापकीर, भानुदास महाराज तापकीर, रामभाऊ महाराज वर्पे अनेक वर्षांपासून काकडा आरतीचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. याप्रसंगी ग्रामस्थानी साथ संगत दिली. परिसरातून मोठ्या प्रमाणात महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. येथील भजनी मंडळ, ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.