मेहकर (प्रतिनिधी) – अण्णाजी लिंबाजी फुलारे हे दिनांक ३० ऑक्टोबर रोजी राहणार देऊळगाव मही, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा हे सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धोतरा नंदई शिवारातील पाझर तलाव नंबर दोन मध्ये त्यांचे साहित्यसह मासेमारी करण्यासाठी गेले होते. संध्याकाळपर्यंत शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत, म्हणून त्यांच्या पुतण्याने अंढेरा पोलीस स्टेशनला मिशींग बाबत तक्रार दाखल केली होती. ते तलावाच्या पाण्यात बुडाले होते. परंतु त्यांचे प्रेत मिळून आले नव्हते. आज दिनांक १ नोव्हेंबररोजी सकाळी साडेसहा वाजता धोत्रा नंदाई शिवारातील पाझर तलाव नंबर दोन येथे जाऊन पाहणी केली असता, त्यातील फिर्यादीचे काका अण्णा निंबाजी फुलारे राहणार देउळगाव मही यांचे तलावाच्या पाण्यावर तरंगत आहे असे दिसून आले. अशा रिपोर्ट वरून मार्ग दाखल करण्यात आला. तेथील स्थानिक मच्छीमाराच्या साह्याने प्रेत बाहेर काढून शेवविच्छदनासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे प्रेत त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पो का अनिल खर्डे हे करत आहे.
Read Next
2 days ago
मेहकर पेटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला!
2 days ago
मेहकरचा चिरेबंदी ‘प्रतापगड’ तीस वर्षानंतर ढासळला; गुलाल, निळही बेरंग!
2 days ago
मेहकर शहरात दंगलीची शक्यता, मनाई आदेश लागू; नगरपरिषद हद्दीतील सीमाही सील!
4 days ago
भाजपने जागा राखल्या, शिंदे गटाने एक जागा गमावली!
1 week ago
डॉ. ऋतुजा चव्हाण यांना सहानुभूतीची लाट तारणार का? की पहिले पाढे पंचावन्न!
Leave a Reply