Aalandi

राठी ग्रुप रक्तदान शिबिरास कामगारांचा प्रतिसाद

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील धानोरे मधील राठी ग्रुप अंतर्गत पॉलीबॉण्ड इंडियाया प्रा.लिमिटेड, राठी ट्रान्स पॉवर इंडिया प्रा. लिमिटेड, इनलॅक बुधराणी ब्लड बँक पुणे यांच्या वतीने राठी ट्रान्स्ट्रांपॉवर इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीत पुणे जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या शिबिरात १०० वर रक्तदाते कामगारांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.

याप्रसंगी राठी ग्रुप समूहाचे सी.ओ.ओ. भालचंद्र कुलकर्णी, व्हाईस प्रेसिडेंट कुमार दंडापाणी, डॉ. श्री पडवळ, मुकेश कुलकर्णी, साहेब शिंदे, शरद राऊत, ब्लड बँकेच्या डॉ. जया कुलकर्णी, जनसंपर्क प्रमुख प्रकाश निंबोरे यांचे मार्गदर्शन झाले. या रक्तदान शिबिरात राठी ग्रुपचे कर्मचारी, स्टाफ, युनियन कमिटी मेंबर यांनी शिबिराचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी शंभरावर कामगारांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. पंचकोशीत राठी ग्रुपचे वतीने विविध सामाजिक,शैक्षणिक,आरोग्यविषयक उपक्रम राबवून परिसरात सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. यात स्थानिक नागरिक,संस्था यांना प्रत्येक्ष लाभ मिळत आहे. राठी ग्रुप सामाजिक उपक्रमास नेहमी प्राधान्य देत आहे. पुण्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन तात्काळ रक्तदान शिबीर आयोजित करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी आळंदीचे माजी नगरसेवक राजेंद्र गिलबिले, संतोष ठाकूर, शिवाजी भोसले, माऊली शेखर आदींनी शिबिरास भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!