आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील संत श्री जलाराम सत्संग मंडळ, आळंदी पुणे यांच्या वतीने परंपरेने संत जलाराम बाप्पांच्या लक्षवेधी प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजलेल्या वाहनातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे आळंदी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रासह गुजरात मधील जलाराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आळंदीत जलाराम जयंती दिनी परंपरागत धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. जलाराम बाप्पांचे प्रतिमेची लक्षवेधी मिरवणूक झाली. मिरवणुकीचे शहरात स्वागत करण्यात आले. जयंती दिनी धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम,पूजा पाठ , महाप्रसाद , रक्तदान शिबीर उत्साहात झाले.
जुन्या नगरपरिषद चौकात जलाराम सत्संग मंडळाचे अध्यक्ष धीरूभाई राजा यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष नगराध्यक्ष सुरेश वडगावकर यांचे हस्ते झाला. या नंतर नगरपरिषद चौकातील छतारापती शिवाजी महाराज यांचे अर्ध पुतळा स्मारक येथे पुष्पहार अर्पण करण्यात आला. मिरवणूक नगरपरिषद चौक मार्गे नगरप्रदक्षिणा करीत श्री जलाराम मंदिर येथे मोठ्या उत्साहात आली. मंदीरात येथील सामाजिक कार्यकर्ते आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे वाढदिवसानिमित्त ट्रस्टचे अध्यक्ष धीरुभाई राजा यांचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आळंदी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, पांडुरंग कांबळे, माऊली शेखर, शिवाजी भोसले, राहुल चव्हाण, विलास वाघमारे, हमीद शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मिरवणुकीचे आळंदी नगरपरिषद चौकात माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, अजित वडगावकर,अनिल वडगावकर, उद्योजक बाळासाहब वडगावकर, आनंद वडगावकर यांचेसह विविध सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी, नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत उत्साहात ठिकठिकाणी केले.
जलाराम जयंती निमित्त रक्तदान शिबिरात भाविक भक्तांनी रक्तदान केले. महाप्रसाद वाटप,सांस्कृतिक कार्यक्रम परंपरेने मोठ्या भक्तिमय उत्साहात झाले. यावेळी विविध रंगी फुलांनी लक्षवेधी सजविलेल्या वाहनावरील श्री जलाराम बाप्पाची प्रतिमा भाविकांचे आकर्षण ठरले. मंदिर व परिसरात पुष्प सजावट , विद्युत रोषणाई ने परिसर उजळून निघाला. कोरोनाच्या महामारीचे संकटा नंतर यावर्षीची जलाराम जयंती भाविकांचे मोठ्या संख्येने आणि उत्साहात पार पडली.