मेहकर (रवींद्र सुरूशे) – गेल्या काही दिवसांपासून राज्याला थंडीचा विळखा पडलाय. मेहकर तालुक्यातही थंडी हळूहळू वाढू लागली असून येत्या काही दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरणार आहे. सहा नोव्हेंबरपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात थंडीची मोठी लाट पसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आता हळूहळू थंडी वाढत जाईल, असा अंदाज बुलढाणा हवामान तज्ज्ञ मनीष येदूलवार यांनी व्यक्त केलेला आहे.
मेहकर तालुक्यात थंडी वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर उबदार कपडे आणि स्वेटर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसते. पावसाने उसंत दिल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.तोपर्यंत राज्यात थंडीचा आगमन झाले. दिवाळीपासूनच तापमानाचा केल्या चार दिवसात थंडीचा कडाका वाढला असून, सकाळच्या वेळेस बोचर्या थंडीमुळे कुडकुडण्याची वेळ आली आहे. २३ ऑक्टोबरला मान्सून परतल्यानंतर थंडी जाणवायला सुरुवात झाली. जिल्ह्यातील अनेक शहरात किमान तापमान १७ ते २० अंशापर्यंत खाली आले. नोव्हेंबर महिना थंडीचा असेल असे हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील यांनी सुद्धा हा अंदाज व्यक्त केलाय. दरम्यान वाढणार्या थंडीच्या पार्श्वभूमीवर कपाटातून स्वेटर, मफलर, कान टोपी, बाहेर काढली जात असून, उबदार कपडे विक्रेत्यांकडे गरम कपडे खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येते आहे.