शेतकरी मेळाव्यातून उद्धव ठाकरे डागणार बंडखोरांसह शिंदे सरकारवर तोफ!
– जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शिवसैनिकांची तयारी
मेहकर (रवींद्र सुरूशे) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सज्ज झाले आहेत. २६ नोव्हेंबरला चिखली येथे ठाकरेंची भव्य जाहीर सभा होणार असून, ही सभा शेतकरी मेळावा असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकरी मेळावा घेणार आहेत. २६ नोव्हेंबरला बुलढाण्यातील चिखली तालुक्यात हा शेतकरी मेळावा होईल आणि ठाकरे शेतकर्यांच्या मुद्द्यावरून आता शिंदे सरकारला घेरणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरेल. शिवसेना नेते आदित्य ठाकरे असोत किंवा स्वतः उद्धव ठाकरे असोत, त्यांनी शेतकर्यांच्या गाठीभेटी मागील काही दिवसांमध्ये घेतल्या आहे. शेतकर्यांच्या बांधावर ते गेले होते. आणि शेतकर्यांसाठीच्या मागण्या आहेत, त्या आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्याचा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आता थेट पहिला मेळावा हा शेतकर्यांचा होणार आहे. ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे शेतकर्यांच्या जाहीर सभेमध्ये संबोधन करणार आहेत. त्यामुळे नक्कीच शिंदे आणि फडणवीस सरकारवर हल्लाबोल करतील कारण का? हेही पाहणे महत्त्वाचे आहे. त्यांचेच एक आमदार कैलास पाटील यांनीदेखील ओला दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी उपोषण केले होते, ते उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेनंतर त्यांनी मागे घेतल होत. पण आता शेतकर्यांच्या हातात नेमकं काय मिळालेला आहे आणि शेतकर्यांना खरंच मदत मिळते का याचा पाठपुरावा सध्या उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम करताना पाहायला मिळत आहे आणि याच माध्यमातून या २६ नोव्हेंबरला बुलढाण्यातल्या चिखली या ठिकाणी शेतकर्यांचा पहिला जाहीर मेळावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. या मेळाव्यातून नक्कीच शिंदे आणि फडणवीस सरकार यांच्यावर धनुष्यबाण आणि आपली टीकेचे बाण सोडताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे या सभेनंतर शिंदे आणि फडणवीस सरकारची काय भूमिका असणार आहे, हेदेखील आपल्याला पाहावं लागणार आहे. टप्प्याटप्प्याने ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्र घेरणार आहे. सर्वप्रथम मेळावा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे होणार कारण चिखली हे एक मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्याचबरोबर विदर्भ मराठवाडा येथीलसुद्धा शिवसैनिक तेथे येऊ शकतात व त्यांना येण्यास सोपे आहे, त्यामुळे चिखली येथे हा मेळावा होणार, अशी माहिती जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश डोंगरे, शिवसेनेचे ठाकरे गट यांनी दिली आहे.
आमची ३१ ऑक्टोबरला ‘मातोश्री’वर ठाकरे साहेब व शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली असून, येत्या २६ नोव्हेंबरला चिखली येथे भव्य शेतकरी मेळावा घेणार असल्याचे बैठकीत निर्णय झाला आहे.
– जालिंदर बुधवत, बुलढाणा जिल्हा प्रमुख
आदित्य ठाकरे यांची ७ नोव्हेंबरला सभा?
शिवसेनेतील बंडखोरीनंतर दुभंगलेल्या शिवसेनेला बळ देण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे जोमाने करत आहेत. संपूर्ण राज्यभर ठाकरे पिता-पुत्र दौरे करत शिवसेनेची नव्याने बांधणी करत आहेत. यादरम्यान आदित्य ठाकरे पुढील सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्हा दौर्यावर येत असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांकडून मिळाली होती. मेहकर आणि बुलढाणा या दोन ठिकाणी आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून, ते काय बोलतील, याकडे आतापासूनच अनेकांचे लक्ष लागले आहे.
—————