आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील इंद्रायणी नदीचे स्थान माहात्म्य जोपासत नदी घाटावर खंडग्रास सूर्यग्रहण काळात प्रथापरंपरांचे पालन करीत साधकांनी सूर्यग्रहण काळात मंत्रजप साधना करीत इंद्रायणी नदीत स्नान केले. यासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणात साधक, नागरिक,भाविक यांनी गर्दी केली होती.
इंद्रायणी नदी घाटावर अयोध्या येथील राम मंदिराचे खजिनदार आळंदी येथील वेदपाठशाळेचे प्रमुख आचार्य तपोवन मार्गदर्शक प्रमुख गोविंददेव गिरी उर्फ किशोरजी व्यास यांनी साधना केली. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरा लगत असलेल्या पवित्र इंद्रायणी नदी घाटावर यासाठी पंचक्रोशीतून साधक, नागरिकांची गर्दी विशेष राहिली. इंद्रायणी नदी घाटावर खंडग्रास सूर्यग्रहणाच्या काळात साधकांनी नाम स्मरण, जप, तप व मंत्रोच्चार करीत साधना केली. यावेळी किशोरजी व्यास यांनी विद्यार्थ्यांना धार्मिक दीक्षा देत ग्रहण काळातील धार्मिक महत्त्व जोपासले. तपस्वी साधक भाविकांनी इंद्रायणी नदीच्या पात्रात उभे राहून साधना केली. खंडग्रास ग्रहणदिनी इंद्रायणी नदीचे दुतर्फ़ा भाविक,नागरिकांची गर्दी लक्षणीय होती.
इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून पवित्र इंद्रायणी नदीचे धार्मिक प्रथा परंपरांचे पालन केले. ग्रहण कालावधीनंतर चे धार्मिक संस्कार जोपासत तीर्थक्षेत्र आळंदीतील वैभव असलेली इंद्रायणी नदी चे स्थानमाहात्म्य अधोरेखित केले. येथील नदीपात्रात वारकरी, भाविक, साधक आणि आळंदीतील नागरिक महिला, पुरुष, मुले यांनी ग्रहण काळात सूर्यग्रहण संपेपर्यंत मंत्राचा जप केला. धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत साधकांनी जप मंत्रोचार केला. इंद्रायणी नदीतील पाण्यात उभे राहून साधना केली. सव्वा सहा नंतर खंडग्रास ग्रहण सुटल्यावर परिसरातील नागरिकांनी देखील नदीत स्नान करण्यास गर्दी केली. अनेक साधकांनी तसेच नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्यास उंचावरील ठिकाणी गर्दी केली.