आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वसुबारस निमित्त परंपरांचे पालन करीत आळंदी शहर व परिसरात गोमाता, गोवत्स पूजन आळंदी पंचक्रोशीत नियोजन करण्यात आले होते. यास शहरांसह परिसरात ठीक ठिकाणी गोवत्स पूजनाचे कार्यक्रम उत्साहानी आनंदी वातावरणात परंपरेने झाले. आळंदी शहर व लगताच्या गावांमध्ये १८७ ठिकाणी गोवत्स पूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यास माता-भगिनींचा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या निमित्त मोठा प्रतिसाद मिळाल्याने संयोजक गोपालक, नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. यासाठी गोपालक गणेश गरुड यांनी केलेल्या आवाहनास परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला
आळंदी शहरातील माजी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया ,माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, शहराध्यक्ष किरण येळवंडे, माजी नगरसेवक सचिन काळे ,भागवत आवटे, ऍड प्रमोद गड्रेल, माजी नगरसेवक दिनेश घुले, भाजपचे सरचिटणीस भागवत काटकर, सुदीप गरुड , बंडू नाना काळे, विनायक पितळे, रामभाऊ निळे, सोमनाथ गोरे, समीर गोरे, विनोद पगडे, माजी नगरसेवक संतोष गावडे, गणेश दाभेकर, राहुल जोशी, रवींद्र गव्हाणे, रमाकांत शिंदे , उपसरपंच किरण मुंगसे, शुभम मुगंसे, सागर चौधरी, पंडित गोडसे, सुरेशआप्पा लोखंडे आदी गो सेवकांनी, गोभक्तांनी, गोरक्षकांनी तसेच परिसरातील गोशाळा, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते यांनी परिश्रम पूर्वक या वर्षी गोवत्स पूजनाचे यशस्वी नियोजन केले. दोन दिवस गोसेवकांनी गोवत्स पूजा करीत उत्साही प्रतिसाद दिला. पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात गोवत्स पूजन सोहळा साजरा करण्याचा संकल्प यावर्षी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने करण्यात आला. गोसेवकांनी गोवत्स पूजनास परिश्रम घेतल्या बाबदाल मन:पुर्वक अभिनंदन करीत संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश गरुड यांनी सर्वांचे आभार मानले.