Breaking News! बुलढाण्यातील दुग्ध व पशुसंवर्धन विभागातील अधिकार्यांच्या सुट्ट्या रद्द!
– राज्यभरातील अधिकारी, कर्मचारी यांना ‘लम्पी’ रोगाला आटोक्यात आणण्याचे आदेश!
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच बुलढाणा जिल्हा दौर्यावर येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यासह राज्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव पाहाता, त्यांनी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या दिवाळी सुट्ट्या रद्द केल्या असून, हा रोग आटोक्यात आणण्याचे आदेश दिले आहेत. विखे पाटील हे २४ तारखेला औरंगाबाद व नंतर बुलढाणा जिल्हा दौर्यावर येत आहेत.
दिवाळीपेक्षा बळीराजाला मदत करण्यास आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे राज्यातील दुग्ध आणि पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिकार्यांच्या सुट्ट्या रद्द करून नेमणुकीच्या ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात आहेत, असे मंत्री विखे पाटील यांनी आमच्या मुंबईतील प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तसेच, औरंगाबाद व बुलढाणा जिल्हा दौरा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
लम्पी रोगाचा उद्रेक झाल्यानंतर राज्य सरकारने जनावरांचे आठवडे बाजार, जनावरांची वाहतूक यावर निर्बंध आणले आहेत. राज्यात १०० टक्के लसीकरण झाले आहे. लम्पी आटोक्यात येत असतानाच अचानक प्रादुर्भाव वाढला आहे. जेथे तांडे आहेत तेथे? सुविधा नाहीत. बाहेर जनावरे चरण्यासाठी जात असल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी संकटात असल्याने ही दिवाळी शेतकर्यांना संकटात सोडून साजरी करणार नाही, अशी भूमिकाही विखे पाटील यांनी घेतली आहे.
——————–