रायगड(जिल्हा प्रतिनिधी) – रायगड-पुणे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महामार्ग महाड-पंढरपुर वरंध घाट गेली चार वर्ष सलग खचत रस्त्याला भेगा पडत आहे. घाटाला अनेक ठिकाणी भेगा पण गेल्या आहेत. त्याचं कारणास्तव घाट ६ महिने बंद होता. याचे मुख्य कारण म्हणजे चार वर्षा पुर्वी रिलायंस कंपनीची जिओ केबल रस्त्याच्या कठाड्याच्या बाजुने खोदकाम करून टाकण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ता खचण्याचे सत्र सुरू आहे. गेली दोनवर्ष कोट्यवधी रूपये खर्च करून तुटलेला भाग बांधण्यात आला होता. वरंध घाट फक्त इतिहासात राहतो ? की काय असी भावना नागरिकांच्या मनात येत होत्या. रस्त्याचे पाण्याचा निचरा होण्यासाठी पाट काढण्याचे काम चालू झाले आहे.
या घाट मार्ग पुणे,दापोली,महाड,भोर मोठ्या प्रमाणात दळणवळण होत असते.हा घाट बंद पडल्यामुळे घाटातील हॉटेल व्यावसाईकांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहिला होता.त्याच बरोबर शिवथर घळईला येणारे पर्यटक सुद्धा मंदावले होते.परंतु राज्य शासनाकडून क्रेंद शासनाकडे हस्तांतरीत केल्याने हा वरंध घाट लवकर होईल अशी आशा ,महाडकर, हाॕटेल व्यावसाईक,येणारे पर्यटक व वरंध ग्रामस्थ करीत आहे.