पुणे (विशेष प्रतिनिधी) – चीनमधून इलेक्ट्रिक दुचाक्या आणून त्या महाराष्ट्रात विकण्याच्या काही छोट्या कंपन्यांच्या उद्योगामुळे इलेक्ट्रिक दुचाकी उद्योग अडचणीत सापडला असून, अशा दुचाक्यांबाबत ग्राहकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच, राज्यात परिवहन आयुक्तांनी बॅटरी क्षमता व वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्या दुचाक्यांवर कारवाई सुरु केल्याने ग्राहकांनी या दुचाक्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात फक्त ओलाच्या सर्वाधिक दुचाक्या विकल्या गेल्या असून, इतर कंपन्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.
पुण्यात सर्वाधिक ई-दुचाकी निर्मिती करणार्या कंपन्या आहेत. यापैकी अनेक कंपन्या चीनमधून स्वस्तात या दुचाक्या आयात करतात, व भारतात त्यांना आपल्या कंपनीचे लेबल लावून या दुचाक्या ग्राहकांना विकतात. त्यामुळे या दुचाक्यांमध्ये अनेक प्रोब्लेम येत आहेत. तसेच, राज्य परिवहन आयुक्तांनीदेखील अशा दुचाक्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. २५ पेक्षा कमी स्पीडच्या गाड्यांची नोंद होत नसल्याने त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न या कंपन्यांनी केला होता. प्रत्यक्षात या दुचाक्यांचा स्पीड जात आहे, त्या सर्व दुचाक्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जात आहे. परिणामी, दुचाकी विक्रीचा वेग मंदावलेला आहे.
Leave a Reply