नवी दिल्ली – कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचे कारण देत टाटा मोटर्स या देशातील अग्रगण्य वाहननिर्मिती कंपनीने आजपासून आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत ०.५५ टक्क्यांनी दरवाढ करण्याची घोषणा केली आहे. विविध मॉडेल व वाहनांनुसार या किमती कमी-जास्त असतील.
देशातील कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने उत्पादन खर्चही वाढला असल्याचे सांगून, टाटा मोटर्सने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. ते पाहाता, इतर वाहननिर्मिती कंपन्याही आपल्या वाहनांच्या किमती वाढवू शकतात.
टाटा मोटर्स ही देशातील सर्वात मोठी वाहननिर्मिती कंपनी आहे. कंपनीच्या पंच, नेक्सॉन, हरिअर आणि सफारी या प्रवासी वाहनांना देशात मोठी पसंती आहे. त्यामुळे या गाड्यांच्या किमतीत आता अर्धा टक्क्याने वाढ होणार आहे.
विशेष बाब म्हणजे, टाटा मोटर्सने या महिन्यातच व्यावसायिक वाहनांच्या किमतीत दीड ते अडीच टक्क्यांनी वाढ केलेली होती.
—————
Leave a Reply