सोलापूर (प्रतिनिधी) – दोडडी (तालुका दक्षिण सोलापूर) येथे विविध कार्यकारी विकास सोसायटीची निवडणूक लागली असून, बळीराजा परिवर्तन विकास पॅनल आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यामुळे यंदाची ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ही निवडणूक 13 जागेसाठी होत असून एकुण मतदार 245 इतकी आहेत. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ज्येष्ठ नेते तारासिंग राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, की ही संस्था डबघाईला येण्यामध्ये कोण कारणीभूत आहे याचा शोध घेण्यासाठी बळीराजा पॅनलला शेतकऱ्यांनी मतदान करण्याचे आव्हान केले. याबरोबरच ठरावीक शेतकऱ्यांनाच मतदानाचा अधिकार दिल्याने अनेक शेतकरी विकास सोसायटी पासून दूरच आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार कधी मिळणार असा प्रश्नही यावेळी लक्ष्मण गिराम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विचारला.
ज्येष्ठ नेते शिवाजी राठोड म्हणाले की, ही संस्था 75% सभासदांना अद्याप एक रुपयाचे ही कर्ज देण्यात आले नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना खासगी सावकार शोधावे लागत आहे. त्यामुळे बळीराजा परिवर्तन पॅनलचे हात मजबूत केल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांना कर्ज देण्याची ग्वाही याप्रसंगी दिली. यावेळी संभाजी जेडगे, हुसेन शेख, सिध्दाराम बिराजदार , काशिनाथ म्हेत्रे, मलका गावडे, संजय जेडगे, अँड. धनराज होनपारखे, उपसरपंच लक्ष्मण गावडे, संभाजी चौगुले, सचिन माळवदकर, बाळू येरवडे, विजय कोरे, संतोष कोरे, योगेश गिराम आदी उपस्थित होते.