कर्जत (प्रतिनिधी): कर्जत शहरातील सर्व सामाजिक संघटना व त्यांनी गेली दोन वर्षे केलेले श्रमदानातून काम ही शहराची मालमत्ता आहेत व त्यात आपण सर्वांनी वाढ केली पाहिजे, असे गौरवोद्गार प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी काढले. कर्जत येथे सलग दोन वर्षे श्रमदान करून शहराला स्वच्छ, सुंदर व हरित बनवणार्या श्रमप्रेमीच्या कौतुक सोहळ्यात ते बोलत होते.
कर्जत येथे २ ऑक्टो २०२० पासून सलग दोन वर्ष सर्व सामाजिक संघटना या नावाने विविध नागरिक एकत्र येऊन शहरात स्वच्छता करत आहेत. वृक्षारोपण करत आहेत व लावलेल्या झाडाचे संगोपन करत आहेत, सलग दोन वर्षे न थांबता केलेल्या कामाचा आज द्विवर्षपूर्ती निमित्त कौतुक सोहळा बाजारतळ येथे नगरपंचायतीने आयोजित केला होता. सकाळी ८ ते ९ या वेळे तील शहरातील सर्व शाळा महाविद्यालये यांच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकांनी विविध भागात श्रमदान करत स्वच्छता केली व आपल्या शाळेपासून फेरी काढत बाजारतळ या ठिकाणी आयोजित कौतुक सोहळ्यास सहभाग नोंदवला. यामध्ये दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, अमरनाथ विद्यालय, समर्थ विद्यालय, कन्या विद्या मंदिर, श्री श्री रविशंकर विद्यालय, सद्गुरू महिला महाविद्यालय, कोटा मेंटार शाळा आदी शाळा सहभागी झाल्या होत्या.
बाजारतळ या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर समर्थ विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत राऊत, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय नगरकर, सुनील शेलार, माजी नगराध्यक्ष नामदेवराव राऊत, मा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, नगराध्यक्ष उषा राऊत, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी मनोगत व्यक्त करताना कर्जत शहरात सुरू असलेल्या कामाचे विशेष कौतुक केले. सर्व सामाजिक संघटनांच्यावतीने अनिल तोरडमल, आशिष बोरा व भाऊसाहेब रानमाळ यांनी मनोगत व्यक्त करताना गेली दोन वर्ष सहकार्य करणार्या सर्वांचे आभार मानताना स्वच्छ सुंदर व हरित कर्जत हे टिकविण्याची सर्वाची बजबाबदारी असून या अभियानात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे शेवटी पाणीपुरवठा सभापती भास्कर भैलूमे यांनी आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनमोहनदास खुडे यांनी केले. यावेळी सर्व सामाजिक संघटनेच्या सर्व श्रम प्रेमीशिलेदाराना एकत्र एक फेटा देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास नियमित श्रमदान करणारे श्रमप्रेमी शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास माजी नागराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, सभापती छाया शेलार, लंकाबाई खरात, नगरसेवक सतीश पाटील, नगरसेवक अमृत काळदाते, नगरसेवक भाऊ तोरडमल, नगरसेवक अभय बोरा, नगरसेवक रज्जाक झारेकरी, रवींद्र सुपेकर, लालासाहेब शेळके व नगर पंचायतचे कर्मचारी आदी सह अनेक जण उपस्थित होते.