AalandiHead linesKhandeshWomen's World

नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी ५५ हजार भाविकांनी भक्तिमय वातावरणात घेतले देवीचे दर्शन

आळंदी / वणी ( अर्जुन मेदनकर ) : हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये देवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते. शनिवारी नवरात्रीचा सहावा दिवस. या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. आईचे हे रूप दयाळू असल्याचे म्हटले जाते. देवीचा जन्म कात्यायन ऋषींच्या घरी झाला, त्यामुळे देवीला कात्यायनी देवी म्हणून ओळखले जाऊ लागले. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा करा. तिच्या चार हातांमध्ये शस्त्रे, शस्त्रे आणि कमळ असून तिचे वाहन सिंह आहे. ती ब्रजमंडलाची प्रमुख देवता आहे. आई स्वतः त्या भक्ताचे सर्व रोग आणि दोष दूर करते सुख-समृद्धी देते असे म्हणतात की जो व्यक्ती मातेची खऱ्या मनाने पूजा करतो त्याचे सर्व संकट दूर होतात.

आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी हजारो भाविकांनी भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेतले. यावेळी श्री सप्तशृंग देवीची पंचामृत महापूजा उच्च न्यायालय, मुंबई येथील न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू सांबरे यांनी सपत्नीक केली. प्रसंगी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड चे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी देसाई, धर्मादाय सह आयुक्त तुफानसिंग अकाली, जिल्हा व सत्र न्यायाधीश बाळासाहेब वाघ आदी प्रत्यक्ष पूजेत सहभागी झाले. सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. प्रसंगी नामदार डॉ. विजय गावित, महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, नाशिक जिल्हाधिकारी गंगाथरन डी., सहा पोलीस अधीक्षक खांडवी, विश्वस्त व तहसिलदार बंडू कापसे, विश्वस्त ॲड. दिपक पाटोदकर, एन. डी. गावित, माजी मंत्री आनंदराव आडसुळ यांनी श्री भगवतीचे दर्शन घेतले. प्रसंगी विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदी उपस्थित होती.

महाराष्ट्रासह विविध राज्यातील आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे १२ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्र उत्सव दरम्यान कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, लेखापाल भरत शेलार, भक्तनिवास सहा विभागप्रमुख शाम पवार, प्रसादालाय पर्यवेक्षक प्रशांत निकम, सह पर्यवेक्षक रामचंद्र पवार, उपकार्यालाय प्रमुख गोविंद निकम, मंदिर विभाग सहा प्रमुख नारद आहिरे, सह पर्यवेक्षक सुनील कासार, सह पर्यवेक्षक विश्वनाथ बर्डे, धर्मार्थ रुग्णालय प्रमुख डॉ. धनश्री धोडकी, विद्युत विभाग प्रमुख जगतराव मुदलकर, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख व वाहन विभाग प्रमुख संतोष चव्हाण तसेच सर्व ट्रस्ट कर्मचारी, पुरोहित वर्ग, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, रोपवे व्यवस्थापक राजू लुम्बा यांसह जिल्हा पोलीस व महसूल प्रशासन विभाग आदी विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!