LATURMarathwada

हंगरगा येथे स्वच्छता मोहीम, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी हाती घेतला झाडू!

– नरेंद्र मोदी यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे देशात सामाजिक कार्य व्यापक झाले – राहुल केंद्रे

लातूर (गणेश मुंडे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सेवा पंधरवडा मोहीम राबवत असून, याच अनुषंगाने हंगरगा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राहुल केंद्रे यांनी स्वतः हाती झाडू घेऊन या मोहिमेत सहभाग घेतला व गावाची स्वच्छता केली.

या मोहिनेनिमित्त गावातील सामाजिक, राजकीय लोकांनी एकत्र येऊन संपूर्ण गाव, मंदीर, मशीद, बौद्ध विहार, अण्णाभाऊ साठे सामाजिक परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करताना राहुल केंद्रे म्हणाले की, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून आज सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला स्वच्छतेची जाणिव निर्माण झाली असून, याचाच भाग म्हणून भारतीय जनता पार्टीने १७ तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत सेवा पंधरवडा अशा माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच उपक्रमातून आपण आज हंगरगा येथे स्वच्छता मोहीम राबवत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली आठ वर्षे देश प्रगती करत आहे. त्यासाठी मोदी साहेब अविरतपणे दिवसाकाठी १८ ते २० तास काम करत आहेत. शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून मोदी साहेबांनी योजना आखल्या असून, त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी सरकार व भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. अशा जगप्रिय असणार्‍या लोकनेत्याचा वाढदिवस सामाजिक सेवेच्या माध्यमातून आपण साजरा करावा, असे आवाहन राहुल केंद्रे यांनी केले.

यावेळी लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजयमामा पाटील, अ‍ॅडव्होकेट भाऊसाहेब जांभळे, अल्पसंख्यांक मोर्चाचे तालुकाध्यक्ष इरशाद भाई शेख, गावाच्या सरपंच राठोड ताई, उपसरपंच दयानंद सूर्यवंशी, नानासाहेब माने, सत्तार भाई पठाण, अकबर पठाण, गुणवंतराव माने, प्रदीप सूर्यवंशी, संजीव पाटील यांच्यासह गावातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!