AURANGABADMarathwada

औरंगाबादेत नशेच्या गोळ्या विक्री करणारे चौघे जेरबंद

औरंगाबाद (विजय चिडे) – शहरात एनडीपीएस पथक स्थापन झाल्यापासून नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सराईत गुन्हेगार प्रचंड खबरदारी घेत चोरीछुपे हा अवैध धंदा करीत आहेत. अशातच एनडीपीएस पथकास (दि.13) रोजी शहरातील वेगवेगळ्या भागात नशेच्या औषधी गोळयांची सर्रासपणे चढया भावाने विक्री करणारे 1 ) हाशम पाशा चाऊस उर्फ मामे वय 35 वर्षे धंदा हमाली, रा. गल्ली नं.07, संजय नगर, औरंगाबाद 2 ) इर्शाद सय्यद याकुब सय्यद उर्फ सलमान वय 26 वर्षे, रा. मॅकेनिक, रा. सना किराणा जवळ, जिन्सी, औरंगाबाद 3) अब्दुल सलाम अब्दुल शकुर वय – 26 वर्षे, धंदा मजुरी, रा. गल्ली नं. 31, इंदिरानगर, बायजीपुरा,4) शेख सलीम शेख करीम वय 27 वर्षे, रा.रोजाना किराना जवळ, हिनानगर चिकलठाणा या चौघांना एनडीपीएसच्या पथकांनी ताब्यात घेऊन 1,16,425 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, शहरातील एनडीपीएस पथकास गोपणीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम जिन्सीमधील जुना मोंढा, संजय नगर, रेंगटीपुरा भागात गुंगीकारक औषधी गोळयांची सर्रासपणे चढया भावाने विक्री करीत असल्याची गोपणीय बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमीची खात्री करुन NDPS सेलने मेहराज मस्जिद रेंगटीपुरा,औरंगाबाद येथे औषधी निरीक्षक बी. डी. मरेवाड सह सापळा रचुन छापा टाकुन औरंगाबादमध्ये चौघे जण ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यात मिळुन आलेल्या नशेच्या गोळयांबाबत विचारपुस केली असता त्यांनी हिनानगर येथे राहणारा व्यक्ती सलीम शेख करीम वय 27 वर्षे, रा.रोजाना किराना जवळ, हिनानगर चिकलठाणा औरंगाबाद यास देखील कारवाई दरम्यान ताब्यात घेवुन त्याचेकडुन देखील मोठया प्रमाणात नशेच्या गोळयांचा बेकायदेशीर साठा मिळुन आला.
चारही आरोपीतांकडुन एकुण 458 (Nitrosun-10 नावाच्या) नशेच्या गोळया व इतर मुद्देमाल असा एकुण 1,16,425/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन पोलीस ठाणे जिन्सी येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS Act) अधिनियम 1985 कलम 8 (c), 22 (a), 22 (b) सह कलम 328,276, 34. भा.द.वि. सह कलम 18 (A) 18 (c), 27 (B) (ii) औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मा. पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), श्रीमती अपर्णा गिते, मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल दुमे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सपोनि हरेश्वर घुगे, औषध निरीक्षक बळीराम मरेवाड, सफी/ नसीम खान, पोअं/ विशाल सोनवणे, महेश उगले, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, प्राजक्ता वाघमारे, चालक दत्ता दुभळकर सर्व नेमणुक NDPS सेल, गुन्हे शाखा, औरंगाबाद शहर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!