आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील ग्रामदेवता हजेरी मारुती मंदिरात नवशिवशक्ती तरुण मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवात कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष राहुल पाटील चिताळकर यांनी दिली.
या गणेशोत्सवा अंतर्गत रविवारची कीर्तन सेवा ह. भ. प. शांताराम महाराज गांगुर्डे यांची हरीण गजरात झाली. यावेळी श्री हजेरी मारुती गाभाऱ्यात श्रींची आरती गांगुर्डे महाराज यांचे हस्ते झाली. सभागृह मंडपात श्री गणेश आरती पत्रकार अर्जुन मेदनकर यांचे हस्ते झाली. यावेळी मंडळाचे आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष राहुल पाटील चिताळकर, गजानन महाराज पवार, सुनील रानवडे, विशाल वाहिले, सचिन कुऱ्हाडे, नितीन साळुंखे, अभि पवळे, मूर्तिकार बाळासाहेब भोसले, धीरज पोटफोडे, गणपतराव कुऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते माऊली घुंडरे पाटील, प्रशांत जोशी, श्री साहेब शिंदे , सिद्धार्थ चिताळकर पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आळंदीत गौरी गणपती उत्सव ढोले परिवाराने जपली ७५ वर्षाची परंपरा तब्बल दोन वर्षे खंड पडलेला गणेश उत्सव यंदा चार दिवसांपूर्वी सुरू झाला. गौरी गणपतीचे मोठ्या उत्साहात आगमन होऊन गौरी गणपतीचा उत्सव अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात अलंकापुरी नगरीत साजरा होत आहे. येथील स्वर्गवासी अंबुताई मार्तंड ढोले परिवार हे गेली ७५ वर्षापासून अलंकापुरी नगरीत गौरी पूजनाचा कार्यक्रम अतिशय उत्साही स्वरूपात साजरा करतात. त्यामुळे देखावा पाहण्यास मोठी गर्दी जमली होती. गणेश भक्तांची तसेच महिलांची रांग अनेक ठिकाणी पाहण्यास मिळावी. देखाव्यासाठी सुमारे ७५ हजार रुपये खर्चून अतिशय सुरेख देखना गौरी पूजनाचा देखावा सादर करण्यात आला.
एवढेच नव्हे तर अलंकापुरी नगरीतील सर्व गणेश भक्तांना गावातील नागरिकांना गौरी गणपती दर्शनास व तीर्थप्रसादास तसेच महिला भगिनींना हळदी कुंकवास आमंत्रित करीत ढोले पाटील परिवारची परंपरा ७५ वर्षापासून सुरू असल्याचे आप्पासाहेब ढोले यांनी सांगितले. गणेश स्थापनेचा चौथा दिवस असून संपूर्ण शहरात सार्वजनिक मंडळांनी अतिशय सामाजिक, पौराणिक, धार्मिक देखावे सादर केले आहेत. अलंकापुरी नगरीत सर्वत्र गेली चार दिवसांपासून आनंदी आनंद वातावरण आहे. शिवतेज मित्र मंडळाने संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधी ७२५ व्या वर्ष पूर्ती निमित्त चित्रफीत प्रदर्शित केली आहे.