औरंगाबाद (विजय चिडे) – औरंगाबाद शहरातील रामनगर येथील पेट्रोल पंपसमोर दोन व्यक्ती नशेच्या गोळ्या विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनडीपीएस पथकाने कारवाई करत, शेख आसिफ शेख जिलानी (वय 37वर्षे) रा. रेगंटीपुरा जुना मोंढा औरंगाबाद व साबळे वय 21 वर्षे रा. रमानगर,औरंगाबाद या दोघांस ताब्यात घेण्यात आले.
याविषयी सपोनि हरेश्वर घुगे यांनी दिलेली माहीती अशी की, रामनगर येथील पेट्रोल पंप समोर दोन व्यक्ती नशाच्या गोळ्या करत असल्याची माहीती बातमीदारामार्फत मिळाली असता, त्यांनी एच.पी पेट्रोलपंप रमानगर औरंगाबाद येथे दोन इसम गुंगीकारक व नशेसाठा गैरवापर होऊ शकणारे गोळ्या विनापरवान व बेकायदेशिर रित्या विक्रीसाठी घेवून येत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरीष्ठांना देवुन कायदेशीर कारवाई करणेकरिता व बातमीचा शहानिशा करण्याकरिता एचपी पेट्रोलपंप रमानगर शहानुरमिया दर्गा रोड याठीकाणी स्टाफसह जावुन सापळा रचुन बातमीतील वर्णाप्रमाणे दोन इसम बातमीत नमुद ठिकाणी आले असता, त्यांतील एका इसमास जागीच पकडुन त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव शेख आसिफ शेख जिलानी वय 37 वर्षे रा. रेगंटीपुरा जुना मोंढा औरंगाबाद असे सांगितले व पळुन गेलेले ईसमाबाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव शैलेश साबळे उर्फ शैल्या रा रमानगर असे सांगितले. ताब्यात घेतलेल्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात 93 नशेच्या (NITROSEN 10 ) 553.35 रु किमतीच्या गोळ्या मिळुन आल्या. तसेच मोबाईल व रोख रक्कम असा एकुण 9003.35 रु किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. नमुद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे सिडको येथे यापूर्वी सुद्धा नशेच्या गोळ्या विक्रीबाबत गुन्हा दाखल आहे. तसेच फरार आरोपी नामे शैलेश साबळे वय 21 वर्षे रा. रमानगर, औरंगाबाद याचा शोध घेवुन त्यास पोलीस स्टेशन उस्मानपुरा येथे हजर करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) श्रीमती अपर्णा गिते, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल दुमे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, आविनाश आघाव, सहायक पोलीस निरीक्षक, हरेश्वर घुगे, सफी नसीम खान शब्बीर खान, पोलीस अंमलदार महेश उगले, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, विशाल सोनवणे, दत्ता दुभळकर, प्राजक्ता वाघमारे प्रीती ईलग सर्व नेमणुक NDPS पथक औरंगाबाद यांनी केली.