LATURMarathwada

मातृभूमी महाविद्यालयाने तिरंगा रॅलीतून केली जनजागृती

– तिरंगा हातात घेत, विद्यार्थ्यांची साखळी, उदगीरकरांचे वेधले लक्ष

लातूर (गणेश मुंडे) – आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उदगीर येथील मातृभूमी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली, राष्ट्रध्वज प्रदान कार्यक्रम व विद्यार्थ्यांची तिरंगा साखळी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, पोलिस निरीक्षक गोरख दिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड, मातभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उस्तुरे, प्राचार्या उषा कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मातृभूमी महाविद्यालय, कस्तूराबाई नर्सिंग स्कूल , मातृभूमी नर्सिंग स्कूलच्यावतीने घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी तिरंगा रॅली तसेच मातृभूमी महाविद्यालय व नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर यांनी दिलेल्या तिरंगा ध्वजाचे वितरण विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मातृभूमीच्या वतीने तिरंगा रॅलिचे आयोजन करण्यात आले होते. मातृभूमी महाविद्यालयापासून निघालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून जात पुन्हा मातृभूमीत समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा. रुपाली कुलकर्णी यांनी तर आभार प्रा. रणजित मोरे यांनी मानले. यावेळी प्रा. उस्ताद सय्यद , प्रा. रुपाली कुलकर्णी , प्रा. रेखा रणक्षेत्रे, नंदकिशोर बयास , संतोष जोशी , जगदिशा ओमकारे, अन्वेश हिप्पळगावकर , आंबादास पोतदार , आदींनी विशेष प्रयत्न केले.


३०० विद्यार्थ्यांनी साखळीतून ‘घरोघरी तिरंगा’विषयी केली जनजागृती
मातभूमीच्या तिनशे विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेत मानवी साखळी करत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत घरोघरी तिरंगा या मोहिमेविषयी शासकीय दवाखान्याकडे जाणारा रस्ता ते नगर परिषदेच्या जवळील महाराष्ट्र बँकेपर्यंत हातात तिरंगा ध्वज घेत साखळी केली होती. विद्यार्थ्यांनी केलेल्या तिरंगा साखळीने उदगीरकरांचे लक्ष वेधले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!