Chikhali

भरोसा येथील पाझर तलावाच्या साडव्याची भिंत फुटली

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्याकडून पाहणी

मेरा बु , ता. चिखली (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या भरोसा गावालगत नागोबा शिवारातील पाझर तलावाच्या सांडवाची भिंत फुटल्यामुळे जमीन खरडून जावून पिकाचे अतोनात नुकसान झाले . या घटनेची माहिती कृष्णा हटकर यांनी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गांना घेवून घटनास्थळी दाखल झाले आणि तलावाच्या साडव्याची फुटलेली भिंत व खरडून गेलेल्या जमिनीसह नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली .

४ ऑगस्ट रोजी १२ ते १ वाजेच्या दरम्यान शेलगाव अटोळ व मेरा खुर्द महसूल मंडळ मधील अमोना , देऊळगाव घुबे , भरोसा , पिपळवाडी , मिसळवाडी , शेळगाव अटोळ , इत्यादी गावामध्ये अचानक ४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान ढगफुटी सदुश्य पाऊस झाल्यामुळे अतिशय चांगल्या अवस्थेत असलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे .  तसेच नदीकाठच्या शेतामध्ये पावसाचे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडासी आलेला घास या पावसामुळे हिरावून घेतला आहे .  या झालेल्या ढगफुटी सदुश्य पावसामुळे पाझर तलाव ओव्हरफ्लो होवून वाहू लागले, त्यामध्ये मात्र भरोसा येथील नागोबा शिवारातील गट क्र १६७ मधील पाझर तलावाच्या सांडवाची भिंत फुटली, आणि मोठ्या प्रमाणावर साडव्यातून पाण्याचा विसर्ग झाल्याने साडव्या शेजारी असलेल्या नितीन थुट्टे , विष्णू कांबळे , कृष्णा हटकर यांच्या जमिनी खरडून जावून उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी कृष्णा हटकर यांनी या घटनेची माहिती माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांना दिली .

माहिती मिळताच डॉ खेडेकर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेवून घटनास्थळी दाखल झाले .  गावकऱ्यांच्या उपस्थित तलावाच्या साडव्याची फुटलेली भिंत,  खरडून गेलेल्या जमिनी , उभ्या पिकाचे नुकसान याची पाहणी करुण संबंधित महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे सांगितले .  तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस चिखली तालुका अध्यक्ष गजानन वायाळ यांनी प्रत्येक गावात जावून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची व पिकाची पाहणी करुण आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कळविले. त्यांनी सुध्दा जिल्हाधिकारी , तहसीलदार , संबंधित अधिकारी वर्गांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी केंद्र , सरपंच व उपसरपंच डिगाबर जाधव ग्रामपंचायत सदस्य किसन जोहरे गणेश पाटिलबा माजी सरपंच नरहरी थुट्टे , कैलास शेटे , नारायण थुट्टे , नितीन थुट्टे , प्रविण थुट्टे , पिन्टु थुट्टे ,शंकर थुट्टे , सागर जाधव,अ मोना गावाच्या तलाठी वर्षा वानखेडे ,  कृषी सहायक ठेंग मॅडम, कोतवाल सचिन वानखेडे, सरपंच प्रल्हाद इंगळे , भरोसा येथील तलाठी उबरहंडे , शेख , कृषी सेवक सवडतकर मॅडम , व तसेच शेवगाव आटोळ मंडळाचे मंडळाधिकारी काकडे व तलाठी भुतेकर व वरील गावातील कृष्णा मिसाळ बाळासाहेब काळे, गणेश घूबे, शंकर बाप्पु थुटटे, भागवत थुटटे, अंकुश थुटटे ,  मिसाळवाडी येथील सरपंच बाळासाहेब मिसाळ, विलास मिसाळ, अशोक पाटील मिसाळ व नुकसानग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!