मेरा बु , ता. चिखली (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून मामा चौक मधील पोलीस चौकी ते आठवडी बाजार पर्यत रस्त्यावर घाणचघाण असल्याने गावकऱ्यांना जाणे येणे करता येत नसे. तसेच विविध आजाराला सामोरे जावे लागत असे. मात्र अद्यापपर्यंत ग्रामपंचायतने या रस्त्याची दुरुस्ती केली नव्हती. परंतु, उपसरपंच पती यांनी रस्त्यावर मुरूम टाकून घाणीची विल्हेवाट लावली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा हे गाव जिल्ह्यात राजकीयदृष्टया परिचित आहे . मात्र गाव तसं चागली आणि वेशीला टांगलं अशी परिस्थिती या गावाची झाली आहे . गेल्या अनेक वर्षांपासून मामा चौक मधील पोलीस चौकी ते आठवडी बाजारपर्यत रस्त्यावर घाणच घाण असल्याने गावकऱ्यांना जाणे येणे करता येत नव्हते. रस्त्यावर घाण असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे नशिर शेख यांनी ग्रा.प. ला वेळोवेळी रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र ग्रा.प. ने याकडे दुर्लक्ष केले होते . यावर्षी ग्रा.प. मध्ये उपसरपंच पती मुस्तफा शहा यांच्याकडे नशिर शेख यांनी मागणी केली की आमच्या रस्त्याची दुरुस्ती करा, असे तोंडी सांगताच उपसरपंच यांनी लगेच मुरूम रस्त्यावर टाकला आणि काही मुरूम गावकऱ्यांनी लोकवर्गणी व श्रमदान करून रस्त्यावर मुरूम टाकला, आणि घाणीचे विल्हेवाट लावली . रस्ता चागला झाल्याने गावकऱ्यांना रस्त्यावरून जाणे येणे सोपे झाल्याने आनंद व्यक्त करीत आहेत .