पारुंडी येथील मानसिंग नाईक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाविरुद्ध कोषाध्यक्षांचे लाक्षणिक उपोषण
पैठण(ब्रेकिंग महाराष्ट्र):- तालुक्यातील पारुंडी येथील तुळजाभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मानसिंग नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक हे आपल्या पदाचा जाणून बुजून गैरवापर करीत असल्याच्या आरोप करीत शालेय समितीच्या कोषाध्यक्ष हरी मानसिंग राठोड यांनी मुख्याध्यापकाविरुद्ध विद्यालया समोरच रस्त्यावर एक दिवसीय लक्षणिक उपोषण केले.
शालेय कोषाध्यक्ष हरी राठोड यांनी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत वेळोवेळी विनायक हरी राठोड यांनी मानसिंग नाईक विद्यालय येथे शिक्षक म्हणून काम पाहिले त्यांचा कार्यकाळ 2012 ते 2017 या कार्यकाळातील माहिती मागवली होती. ती शालेय मुख्याध्यापक सतिष गोविंद दानशूर (खदगावकर) यांनी प्रत्येक वेळी चुकीची माहिती पुरवली. यामध्ये खूप तफावत असल्यामुळे मुख्याध्यापक हे आपल्या पदाचा गैरवापर व मनमानी करत असल्याने संबंधित प्रशासकीय अधिकारी मुख्यध्यापक यांच्यावर कारवाई करून मुख्याध्यापकांना कायम स्वरूपी बडतर्फ करावे अशी मागणी शालेय शिक्षण संस्थचे कोषाध्यक्ष हरी मानसिंग राठोड यांनी केली. या करिता हरी राठोड यांनी शाळेसमोर रस्त्यावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. दरम्यान रुपाली थोरात (तलाठी ), अर्जुन जाधव (कोतवाल )बाजीराव राठोड पारुंडी तांडा (माजी सरपंच ) गफ्फूर भाई शेख (मा.उपसरपंच ब्राम्हणगाव) चुणीलाल राठोड, अभिषेक राठोड,अलीम पठाण (एमआयएम तालुका अध्यक्ष), गोविंद दौंड, यांनी भेटी दिल्या. यावेळी पोलिसांनी मध्यस्ती केली. त्यामुळे मुख्याध्यापक खदगावकार शालेय संस्था प्रशासकीय अधिकारी यांनी लेखीपत्र दिले. लेखी आश्वानानंतर हरी राठोड यांनी उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस जमादार रावसाहेब आव्हाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.