गुंजाळा जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवाची प्रभातफेरीतून केली जनजागृती
मेरा बु , ता. चिखली (प्रतिनिधी) : भारतीय स्वतंत्रता ला ७५ वर्ष पूर्ण होत आहे, यानिमित्त अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी जि .प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून जनजागृती केली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा पार पडली .
चिखली तालुक्यातील गुंजाळा येथे अमृत महोत्सव उत्सव साजरा करण्यासाठी ग्रा.प. सरपंच यांनी ग्रामसभेचे आयोजन केले होते. तसेच जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून जनजागृती केली. त्यामध्ये गावकऱ्यांना सांगण्यात आले की दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये “घरो घरोघरी तिरंगा” हा उपक्रम प्रत्येक व्यक्तीचा कुटुंबाचा व समाजातील सर्व स्तरातील लोकांचा देशाभिमान जागृत करणारा व स्वातंत्र्य संग्रामात हुतात्म पत्करलेल्या स्वातंत्र विरापासून प्रेरणा घेणारा आहे. हा महोत्सव लोक चळवळ व्हावा व जनसामान्य माणसात राष्ट्र प्रेमाची भावना जागृत व्हावी यासाठी आपणही आपले घरावर तिरंगा राष्ट्रध्वज फडकावून हा अमृत महोत्सव विस्मरणीय व ऐतिहासिक सोहळा साजरा करावा, असे मार्गदर्शन केले .
यावेळी सरपंच केदार, ग्रामसेवक धनवे ,तलाठी , कृषी सहाय्यक उपसरपंच , माजी सैनिक मानिक गवई, तथा सर्व ग्रा.प. सदस्य , तंटामुक्ती समितीचे सर्व सदस्य , पो पा , पत्रकार प्रताप मोरे , गावातील नारायण मोरे , सिध्दांर्थ गवई , बबन मोरे , विजयानंद मोरे , संतोष हिवाळे , विजय जायभाये , योगेश नागरे , रोजगार सेवक , विलास गवई, ज्ञानेश्वर पवार , शाळा समितीचे सभापती गजानन केदार , उपसभापती सुनील मोरे , विश्वास आटोळे , बबन वाघमारे ,सचिन गवई , रामा मोरे , मुख्याध्यापक इंगळे , शेळके , संतोष पवार , अंगणवाडी सेविका शारदा हिवाळे , मिरा खांदे , कविता गवई ,आशा सेविका शारदा केदार बचतगट महिला आदी नागरिक मोठया संख्येत उपस्थित होते.