भोकर (प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषद केंद्रीय नूतन शाळेतील प्राथमिक शिक्षक जी. टी. ढोले यांची सेवानिवृत्ती झाल्यामुळे त्यांचा शाळेच्या वतीने 2 ऑगस्ट 2022 रोजी सत्कार करण्यात आला. केंद्रीय नूतन शाळा भोकर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रप्रमुख आर.एम. शेख हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी अनिल शिरसाट, केंद्रप्रमुख जे.एम .शेख, पत्रकार बी.आर. पांचाळ, मुख्याध्यापक मारुती पट्टेवाड, आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्ती जी. टी. ढोले यांचा सपत्नीक आहेर शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. शांत स्वभावाचे, शिक्षण प्रेमी, विद्यार्थी प्रिय, सामाजिक सेवा म्हणून काम करणारे, शिक्षक जी. टी. ढोले यांच्या कार्याचा गौरव चंदू चक्रवार, विलास कवाणकर, संजय वाघमारे, पि.के. राठोड, सुरंगळीकर, श्रीखंडे, मुख्याध्यापक पट्टेवाड यांनी केला. उपस्थित मान्यवरांनी देखील ढोले यांच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले. सत्काराला उत्तर देताना जी.टी.ढोले यांनी मला सर्वांचे सहकार्य मिळाले असून, विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यात आनंद मिळत होता. पुढे सामाजिक काम करत राहील असे मत मांडून शाळेसाठी विद्यार्थ्यांना वाचनीय सेमी इंग्रजी पुस्तके भेट दिली. शिल्पाताई ढवळे, शिक्षक मारुती जाधव, अलंगवाड, बुडकेवार, हंचनाळीकर, जाधव, आदींसह सर्व शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन बनकर यांनी केले तर आभार श्रीकांत गोरशेटवाड यांनी आभार मानले.