LATURMarathwada

लातूर जिल्हा बँकेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७ कोटी ८२ लाख ४१ हजार रुपये भरला पीकविमा

जिल्ह्यातील १११ शाखेत पिक विमा भरणा सुरू!

लातूर (गणेश मुंडे) – पंतप्रधान खरीप पीक विमा २०२२ अंतर्गत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १११ शाखेतून पिक विमा भरणा सुरू आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक अधिकारी कर्मचारी आगाऊ शाखेवर पाठवण्यात आले असून, २६ जुलै अखेर सायंकाळी पर्यंत ६९ हजार ५८८ शेतकऱ्यांनी ७ कोटी ८२ लाख ४१ हजार रुपयाचा पिक विमा भरणा जिल्हा बँकेच्या जिल्ह्यातील शाखेत केला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील ५ हजार १३७ शेतकऱ्यांनी ६३ लाख ९२ हजार, रेणापूर तालुका ३ हजार ३२२ शेतकरी ३७ लाख ९३ हजार रुपये, औसा तालुका ७ हजार ०४८ शेतकरी ७५ लाख ३० हजार, निलंगा ता लुका ९ हजार ९६७ शेतकरी१ कोटी ६ लाख ६१ हजार रुपये, चाकुर तालुका ११ हजार ५९९ शेतकरी १ कोटी १० लाख ५० हजार, अहमदपूर तालुका ३ हजार ५९३ शेतकरी ४५ लाख ७१ हजार, उदगीर तालुका १३ हजार ५९३ शेतकरी १ कोटी ७४ लाख १७ हजार रुपये, देवणी तालुका ६ हजार १२४ शेतकरी ६७ लाख ७३ हजार रुपये, जळकोट तालुका २ हजार ३१९ शेतकरी २७ लाख १२ हजार, तर शिरूर अनंतपाळ तालुक्यांतील ६ हजार ९७३ शेतकऱ्यांनी ७३ लाख ४२ हजार रुपये पिक विमा भरणा जिल्हा बँकेच्या विविध शाखेत तब्बल आजतागायत एकूण ६९ हजार ५८८ शेतकऱ्यांनी ७ कोटी ८२ लाख ४१ हजार रुपये पिक विमा भरणा केलेला असून पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे.

पिक विमा भरणा करून घेण्यासाठी बँक सज्ज

लातूर शहर, औसा, रेणापूर, चाकुर, शिरूर अनंतपाळ, निलंगा जळकोट उदगीर, अहमदपूर तालुक्यातील विविध शाखेत बँकेत शेतकरी सभासद पिक विमा भरत आहे त्यासाठी बँकेतील इन्स्पेक्टर, अधिकारी कर्मचारी गट्सचिव, सोसायटीचे चेअरमन त्यांना सहकार्य करीत आहेत

पिक विमा भरून घ्यावा, चेअरमन आमदार धीरज देशमुख यांचे आवाहन

पिक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख ३१ जुलै असली तरी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गावात जावून नजीकच्या जिल्हा बँकेच्या शाखेत संपर्क साधून पिक विमा भरणा करावा त्यासाठी स्थानीक गावातील सोसायटी किंवा शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!