CrimeLONAR

रोहीच्या धडकेने दुचाकीवरील देवानगरचा तरूण जागीच ठार

- नवसाच्या कार्यक्रमाहून येताना देवानगर शिवारात घडली दुर्घटना

बिबी (ऋषी दंदाले) – देऊळगाव कुंडपाळ येथून नवसाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने परत येत असताना, रोह्याने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात देवा नगर येथील विष्णू अंकुश पवार (वय ३२) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. देवानगर शिवारातील दर्गा फाट्यानजीक हा अपघात झाला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर असे, की दिनांक ११ ऑक्टोबररोजी रात्री ८:३० वाजता विष्णू अंकुश पवार (वय वर्ष ३२, राहणार देवा नगर ता. लोणार हे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एमएच २८ बीआर ८१७० ने देऊळगाव कुंडपाळ येथून नवसाचा कार्यक्रम आटपून घरी येत असताना देवा नगर शिवारात दर्गा फाट्याच्या वनावर त्यांच्या मोटरसायकलला रोही (नीलगाय) समोरून येऊन धडकली. त्यामुळे त्यांची दुचाकी कडेला असलेल्या घरावर आदळली. त्यात विष्णू पवार हे गंभीररित्या गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. रवींद्र तीरथरसिंह राठोड (वय ३५) राहणार देवा नगर, ता. लोणार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिबी पोलिस ठाण्यात मर्ग नंबर ०९/२०२४ बीएनएसच्या कलम १९४नुसार दाखल करण्यात आला आहे. बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वर शिंदे बक्कल नंबर ९८१ हे सदरचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!