धर्मवीर स्व. दिलीपराव रहाटेंच्या स्वप्नातला मतदारसंघ घडविणार!
- डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी दिली मेहकर-लोणार तालुकावासीयांना ग्वाही
– धर्मवीर स्व. दिलीपराव रहाटेंची जन्मभूमी शेंदल्यातून प्रचाराचा केला शुभारंभ
– निर्मलाताई रहाटे यांना नगरपरिषद अध्यक्षा बनण्यापासून कुणी वंचित ठेवले? हे मेहकरची जनता विसरली नाही!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – धर्मवीर स्व. दिलीपराव रहाटे यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन समाजकारण केले. खर्याअर्थाने लोकनेता म्हणजे काय असते, हे स्व. दिलीपराव रहाटे यांनी दाखवून दिले. अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी खर्याअर्थाने ८० टक्के समाजकारण आणि केवळ २० टक्के राजकारण करण्याचा उच्च आदर्श धर्मवीर दिलीपराव रहाटे यांनी घालून दिला होता. मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास व्हावा, शेतकर्यांच्या जीवनात समृद्धी यावी, हे धर्मवीर दिलीपराव रहाटे यांचे स्वप्न होते. मात्र त्यांच्यानंतर त्यांचे नाव घेऊन काम करणार्यांनी केवळ मतांचे राजकारण केले. धर्मवीर दिलीपराव रहाटे यांच्या नावाने शैक्षणिक संस्था काढली होती. परंतु सदरहू संस्थेत रहाटे आडनावाचे कुणीही संचालक नव्हते. इतकेच नव्हे तर धर्मवीर दिलीपराव रहाटे यांच्या धर्मपत्नी निर्मलाताई रहाटे यांना नगरपरिषदेच्या अध्यक्षा बनण्याची संधी आली असतांना, त्यांना कुणी अध्यक्ष पदापासून दूर ठेवले, हे अद्यापही मेहकरनगरीची जनता विसरलेली नाही. त्यामुळे धर्मवीर दिलीप रहाटे यांना अपेक्षित असलेला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार तथा शेतकरी संघटना क्रांतीकारी पुरस्कृत उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी दिली.
मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास व्हावा, शेतकर्यांच्या जीवनात समृद्धी यावी, हे धर्मवीर दिलीपराव रहाटे यांचे स्वप्न होते. मात्र त्यांच्यानंतर त्यांचे नाव घेऊन काम करणार्यांनी केवळ मतांचे राजकारण केले. धर्मवीर दिलीपराव रहाटे यांच्या नावाने शैक्षणिक संस्था काढली होती. परंतु सदरहू संस्थेत रहाटे आडनावाचे कुणीही संचालक नव्हते. इतकेच नव्हे तर धर्मवीर दिलीपराव रहाटे यांच्या धर्मपत्नी निर्मलाताई रहाटे यांना नगरपरिषदेच्या अध्यक्षा बनण्याची संधी आली असतांना, त्यांना कुणी अध्यक्ष पदापासून दूर ठेवले, हे अद्यापही मेहकरनगरीची जनता विसरलेली नाही.
– डॉ. ऋतुजा चव्हाण
दि. ५ नोव्हेंबररोजी धर्मवीर दिलीपराव रहाटे यांची कर्मभूमी असलेल्या शेंदला येथे डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला, यावेळी त्या बोलत होत्या. शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले, ऋषांक चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. चव्हाण म्हणाल्या, की मेहकर विधानसभा मतदारसंघ ५० वर्षे मागे गेला आहे. केवळ ‘पैशांतून राजकारण आणि राजकारणातून पैसा’ करण्याचे काम इथे सुरु आहे. राज्यात, केंद्रात सत्तेत असलेल्या लोकांना शेतकर्यांच्या दुःखाशी काही देणेघेणे नाही. शेतकरी मेला तरी त्यांना फरक पडत नाही. इथल्या लोकप्रतिनिधींनी शेतकर्यांच्या, सुशिक्षित बेरोजगारांच्या, कष्टकरी मोलमजुरांच्या, शिक्षणाच्या, आरोग्याच्या, पिण्याच्या पाण्याचा आदी प्रश्नांवर कधी विधानसभेत आवाज उठवला का? असा सवाल यावेळी डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी केला. मी राजकारण करण्यासाठी नव्हे तर विकासकारण करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभी ठाकल्याचे सांगत, मायबाप जनतेने एकदा सेवेची संधी द्यावी, दुसर्यांदा तुमच्यासमोर येताना विकासकामांची यादीच घेऊन येते, असेही त्या म्हणाल्या.
ऋतुजा चव्हाण सर्वसामान्यांचे नेतृत्व – डॉ. ज्ञानेश्वर टाले
डॉ. ऋतुजा चव्हाण ह्या सर्वसामान्य कुटुंबातून आणि शेतकरी चळवळीतून संघर्ष करीत पुढे आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, छोटे मोठे व्यावसायिक व सामान्यांच्या वेदनांची जाणीव आहे. ऋतुजा चव्हाण हे विकासाचे व्हिजन तसेच दूरदृष्टी असलेले सुशिक्षित व सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या हक्काच्या आमदार म्हणून तुमच्या आमच्यासाठी विधानभवनात आवाज उठवणार्या शेतकर्यांच्या कैवारी आमदार म्हणून आपल्याला डॉ.ऋतुजा ऋषांक चव्हाण यांना पहायचे आहे, असे प्रतिपादन डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केले.