BULDHANAMEHAKAR

देऊळगाव माळीचा अश्वजीत गवई नॉलेज वेव इंडिया इलाईट परफॉर्मर अवार्ड 2024- राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

बुलढाणा (संजय निकाळजे) – जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात देऊळगाव माळीसारख्या एका छोट्या खेड्यातील अश्वजित गजेंद्र गवई याला उत्तराखंडच्या नैनीताल येथे नॉलेज वेव इंडिया इलाइट परफॉर्मर अवार्ड- 2024″राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आजचे युग हे डिजिटल युग आहे. इंटरनेट व डिजिटल मोबाईल मुळे जग खुप जवळ आले आहे. आजची तरुणाई मोबाईल सोशल मीडियाच्या विविध साइटच्या अति वापराने वेळ व पैसा सतत खर्च करताना आपणास जाणवते. परंतु मोबाइलचा वापर अर्थार्जनासाठी होऊ शकतो. यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. परन्तु ते शोधता आले पाहिजे. व त्याचा वापर करता आला पाहिजे. केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया अंतर्गत देश अधिक प्रभावित झाल्याचे अलिकडच्या काळात जाणवते आहे. सोशल मीडियाच्या विविध साइटवर पैसे कमविन्याचे मार्ग असताना भारत सरकार मान्यताप्राप्त नॉलेज वेव इंडियाच्यावतीने वयाच्या 20 व्या वर्षी एनिमेशन पदवीचे शिक्षण घेणारा व महिन्याला लाखों रुपये कमऊन अर्न एंड लर्न या कमवा व शिका उक्तिला सार्थ ठरवणारा मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा लोर्ड बुद्धा टीवीचे संवाददाता प्रा. गजेंद्र गवई यांचा सुपुत्र अश्वजित गजेंद्र गवई याला उत्तराखंडच्या नैनीताल येथील हॉटेल होकोच्या भव्य सभागृहात राष्ट्रीय स्तरावरील “नॉलेज वेव इंडिया इलाइट परफॉर्मर अवॉर्ड- 2024″या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोशल मीडियाचा वापर करून डिजिटल बिझिनेस मधुन वयाच्या २० वर्षी अश्वजित गजेंद्र गवई हा विद्यार्थी कमवतोय. महिन्याला लाखो रुपये व दोन महिन्यांमध्ये ३ लाख पेक्षा जास्त पैसे कमवुन व कोच प्रशिक्षक म्हणून १०० पेक्षा जास्त लोकांना शिकवलं की मोबाईलचा वापर करून तुम्ही कशे पैसे कमवु शकता? कमी दिवसात जास्त प्रमाणात अचीवमेंट केल्याने सदर राष्ट्रीय पुरस्कार अश्वजित गवई यास नॉलेज वेव इंडिया चे संस्थापक हर्ष विकल अल्फा प्रोजेक्टचे संस्थापक सिझ दीप यांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याने अश्वजित गवई याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. आपल्या अभूतपूर्व यशाचे श्रेय अश्वजित आई वडील सुनंदा गजेंद्र गवई, बहिन कुमारी अस्मिताताई,आजी कौशल्याबाई गवई,रमाबाई जाधव, मामा मामी करुणा- सिद्धार्थ जाधव, आरती प्रदीप जाधव यांचेसह गुरुजन वर्ग, मित्र मैत्रीण व समाज बांधवांना देतोय. “ब्रेकिंग महाराष्ट्र” टीमच्यावतीने सुद्धा अश्वजीतचे अभिनंदन.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!