– बुलढाणा जिल्ह्याची १९ ऑगस्टला भरती
बुलढाणा (संजय निकाळजे) – राज्यातील सुशिक्षित बेकार युवकांची संख्या पाहता विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील ७ जिल्ह्यांमध्ये संभाजीनगर आर्मी भरती बोर्डाच्यावतीने रविवार, दि. ११ ते २३ ऑगस्टदरम्यान अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. पात्र उमेदवारांना त्याच्या ईमेलवर या भरती मेळाव्याचे प्रवेश पत्र पाठविण्यात आल्याचे भरती प्रक्रियेचे संचालकाकडून कळाले आहे.
राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, आणि परभणी जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना जिल्हा निहाय आणि संबंधित तारखेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. रविवार, ११ ऑगस्ट रोजी असिस्टंट स्टोअर कीपर आणि टेक्निकल कॅटेगिरीतील सर्व जिल्ह्यातील उमेदवारांना तसेच परभणी जिल्ह्यातील अग्निवीर जनरल ड्युटी उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच रविवार ११ ऑगस्ट रोजी परभणी, सोमवार १२ ऑगस्ट रोजी नांदेड, मंगळवार १३ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड, खुलताबाद, तालुका. बुधवार १४ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, आणि वैजापूर तालुका. गुरुवार १५ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, मुक्ताईनगर तालुका. १६ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा बोदवड ,चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, पाचोरा तालुका. १७ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा पारोळा, रावेर, यावल तालुका. १७ ऑगस्ट रोजी जालना जिल्हा बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जालना, तालुका. १८ ऑगस्ट रोजी जालना जिल्हा अंबड, जाफराबाद, मंठा, परतूर तालुका. १८ ऑगस्ट रोजी हिंगोली संपूर्ण जिल्हा. १९ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहेकर, खामगाव, शेगाव, संग्रामपूर ,जळगाव जामोद, मोताळा, नांदुरा, मलकापूर तालुका. २० ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यातील अग्नीवर टेक्निकल, अग्नीवर ट्रेडमन (आठवी पास) या पदाच्या उमेदवारांनी हजर राहावे. २१ ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यातील अग्नीवीर ट्रेडसमन (दहावी पास) या पदाच्या उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आर्मी भरती बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.
—
स्कॅनिंग नंतरच प्रवेश
उमेदवारांनी प्रवेश पत्र सोबत आणणे गरजेचे आहे. प्रवेश पत्राच्या आधारे त्याच्या बोटांचे स्कॅनिंग केले जाईल. त्यानंतरच त्यांना शारीरिक व मेडिकल चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. चाचणीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची सप्टेंबर महिन्यात मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे.