Breaking newsHead linesNagpurPolitical NewsPoliticsVidharbha

नागपूर विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न; दोन विदर्भवाद्यांना अटक!

नागपूर (विशेष प्रतिनिधी) – वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, यासाठी आंदोलन पेटले असून, विदर्भाचा झेंडा घेऊन विधानभवनात घुसण्याचा व विधानभवनावर झेंडा फडविण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन तरूणांना पोलिसांनी अटक केली होती. धडक मोर्चाने येऊन विधानभवनावर वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकविण्याचे आंदोलन आज होणार होते. त्या पृष्ठभूमीवर विधानभवन परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन सुरू.

गेल्या ११९ वर्षापासून विदर्भ राज्य निर्माण व्हावे, यासाठी विविध व्यासपीठावर मागणी केली जात आहे. तर १२ वर्षांपासून सतत जनआंदोलने करून विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ राज्याची मागणी तीव्र केली आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा वेगळा विदर्भ हे आंदोलन पेटले असून, क्रांतीदिनाच्या पाडव्याला म्हणजे आज (दि.10) विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकाविणारच असा इशारा विदर्भ आंदोलनाचे नेते वामनराव चटप, प्रकाश पोहरे, अंजना मामर्डे आदींनी दिला होता. तसेच, १० ऑगस्ट रोजी नागपूर येथील विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवण्याचा निर्णय नागपूर जिल्हा व महानगर कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला होता. विदर्भ राज्य निर्मितीसाठी आणि विदर्भातील नागरिकांवरील अन्याय संपवण्याच्या दृष्टीने नव्या केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी ‘महाराष्ट्रवादी चले जाओ”चा नारा देत समिती पुन्हा रणशिंग फुंकणार आहे. या आंदोलनापूर्वी समितीचे कार्यकर्ते यशवंत स्टेडियम येथे १० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता एकत्र आले. त्यानंतर समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विधानभवनापर्यंत लाँगमार्चद्वारे निघाले. परंतु तत्पूर्वीच विधानभवनापासून १ किमी आधीच टेकडी रोडवर पोलिसांनी मोर्चा अडवला. त्या नंतरही पोलिसांना चकवून विधान भवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न दोन कार्यकर्त्यांनी केला असता, पोलिसांनी त्यांना अटक केली. सद्या विधानभवन परिसरात तणाव कायम होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!