– तालुक्यात ५० हजार वृक्षारोपण करणार – तहसीलदार
– भोकर तालुक्यात चौघांचा वीज पडून, एकाचा पुरात वाहून मृत्यू
भोकर, जि. नांदेड (ब्रेकिंग महाराष्ट्र) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लागणार असल्याची माहिती पत्रकार बैठकीस मार्गदर्शन करतांना उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी दिली. जे झेंडा खरेदी करण्यास असमर्थ आहेत, त्यांना शासकीय अधिकारी, कर्मचारी सहाय्य करतील, असेही ते म्हणाले.
देशासाठी स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी क्रांतीवीरांनी बलिदान दिले. अनेक स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले. देशाच्या या स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण होत असून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना देश प्रेमाची भावना दृढ करण्यासाठी, स्वातंत्र्याची भावना जागृत ठेवण्यासाठी शहरी भागातील ८ हजार व ग्रामीण भागातील २० हजार घरांवर तिरंगा राष्ट्र ध्वज लावणार असल्याचे सांगत राजेंद्र खंदारे यांनी झेंडा लावण्याची ज्यांची इच्छा असूनही झेंडा खरेदी करण्यास असमर्थ असणार्यास पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, तलाठी, कर्मचारी, अधिकारी यांच्या सहकार्याने झेंडे प्राप्त करून हर घर झेंडा लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे खंदारे यांनी सागितले.
या वेळी तहसीलदार राजेश लांडगे यांनी तालुक्यात ५० हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट असून १३ टेकड्यांवर वृक्षारोपण करून उद्दिष्टपूर्ती करणार असल्याचे सांगून नैसगिक आपत्तीने तालुक्यात वीज पडून ४ जणांचा तर एकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी ४ लाखाचे धनादेश देऊन तर आत्महत्या केलेल्याच्या कुटुंबास १ लाखाचा धनादेश देऊन सांत्वन केले असून ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या मार्फत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगत, ज्या घरांची पडझड झाली, त्यांचेही पंचनामे करून शासनास माहिती कळवणार असल्याचे तहसीलदार म्हणाले. या बैठकीस जेष्ठ पत्रकार सरोदे सर यांची उपस्थिती होती.
Leave a Reply