पारनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या मातोश्री सायन्स कॉलेज मध्ये सामाजिक उपक्रम राबवण्यात आला येथील विद्यार्थ्यांनी वृक्षरोपण करत सामाजिक संदेश दिला आहे. हा उपक्रम आदर्श उपक्रम असून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून वृक्षांची होणारी तोड टाळण्यासाठी मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानने वृक्ष संवर्धन मोहीम हाती घेतली असून, २०० पेक्षा जास्त वृक्षांचे रोपण मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये केले आहे. हा उपक्रम मातोश्री सायन्स कॉलेजने राबविला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी २०० पेक्षा जास्त वृक्ष लावत त्या वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार केला.
वृक्षरोपण कार्यक्रमानिमित्त मातोश्री शैक्षणिक संस्थेचे सचिव किरण आहेर, टाकळी ढोकेश्वरचे युवा नेते बबलू झावरे पाटील, संचालिका डॉ. श्वेता आहेर, संचालिका शितल आहेर, संस्थेचे रजिस्टर यशवंत फापाळे, प्राचार्य राहुल सासवडे, प्राचार्य असिफ शेख, दस्तगीर शेख, गणेश हांडे, राजेंद्र साठे हे उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सचिव किरण आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान यापुढील काळात वृक्ष चळवळ उभी करणार आहे. या माध्यमातून वृक्ष संवर्धन करून सामाजिक संदेश देण्याचा आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. वृक्ष रोपण करून न थांबता वृक्ष संवर्धन हा एक कलमी कार्यक्रम यापुढील काळात संस्था राबवणार आहे. दरम्यान यावेळी वृक्षरोपण कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.