पारनेर (प्रतिनिधी) : तिखोल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आमदार निलेश लंके साहेब यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व शालेय साहित्यांमुळे त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षणामध्ये गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने काल अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वह्या पुस्तके व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले होते.
यावेळी बोलताना संदीप ठाणगे म्हणाले की, आमदार निलेश लंके हे तालुक्यातील सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय साहित्याचे वाटप करत आहेत. तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून आमदार लंके साहेब यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. आम्ही सर्व त्यांचे सहकारी त्यांच्या कार्याचे अनुकरण करतो तिखोल या ठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने विविध शालेय साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. असेच उपक्रम भविष्यात घेऊन आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक कार्याला आम्ही सर्वजण हातभार लावणार आहोत. तसेच यापुढील काळातही विद्यार्थ्यांचे हित जोपासण्या साठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.
या प्रसंगी उद्योजक निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी संदिप ठाणगे, माजी सरपंच अनिल तांबडे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ठाणगे, शालेय शिक्षण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब विष्णू ठाणगे, उपाध्यक्ष रामदास पंढरीनाथ ठाणगे, संपत ठाणगे, बाबुराव हिंगडे, सुभाष दातीर, गणेश ठाणगे, बाबासाहेब ठाणगे, दत्तात्रय बन्सी ठाणगे, संजय वाघ, सखाराम मंचरे, मावळते अध्यक्ष भाऊसाहेब ठाणगे, युवा नेते संकेत किसन ठाणगे, सचिन सुदाम ठाणगे, दत्तात्रय रामभाऊ ठाणगे, तिखोल निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.