– आता गेट उघडे ठेवल्याने ऐनवेळची परिस्थिती टळली, १६ गावांच्या शेतकर्यांची भीती दूर
चिखली (तालुका प्रतिनिधी) – येळगाव धरण पाणलोटात जोरदार पाऊस होत असल्याने धरण भरले आहे. परिणामी, एकाचवेळी जास्तीत जास्त स्वयंचलित गेट उघडून मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान होण्याचा धोका होता. त्यामुळे तशी परिस्थिती यावर्षीही निर्माण होऊ नये, यासाठी १६ गावांतील शेतकर्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन ऐनवेळी गेट उघडण्याची वाट न पाहाता, आतापासून गेट खुले करण्यात आले असून, ऐनवेळची धोक्याची परिस्थिती टळली गेली आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील आठवड्यात संततधार पावसामुळे येळगाव धरण भरल्याने ८० स्वयंचलीत गेट खुलतील, आणि मागीलवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा शेतीपीक व शेतजमिनी खरडून नुकसान होईल, अशी चिंता शेतकर्यांना सतावत असल्याने ‘स्वाभिमानी’चे विनायक सरनाईक यांनी यावर उपाययोजना करण्याची मागणी १३जुलै रोजी केली होती. दरम्यान, शेतकरी हिताच्या दृष्टिने निर्णय घेत, मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार स्वयंचलीत गेट खुले करण्यात आले होते. यामुळे पिकाचे नुकसान टळले. परंतु सदरचे गेट बंद केल्याने व धरणामधे पाणीसाठा जास्तीचा असल्याने स्वयंचलीत गेट सततधार पावसामुळे केव्हाही खुलू शकतात, भीती शेतकर्यांना असल्याने दि.२२ जुलै २०२२ रोजी बुलढाणा, चिखली तालुक्यातील सोळा गावातील शेतकर्यांसह विनायक सरनाईक यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी बुलढाणा यांची भेट घेऊन सदरील बाब निदर्शनास आणून देत ते बंद केलेले गेट खुले करण्यात यावे, याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, शेती पिकाचे व जमिनीचे नुकसान होणार नाही, यासाठी खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली होती. तर मागण्यांची दखल न घेतल्यास जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला होता. दरम्यान, या मागणीची दखल घेत चार गेट पुनःच्छ खुले करण्यात आले असल्याने नदीकाठच्या शेतकर्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. यावेळी विनायक सरनाईक, शेख रफीक शेख करीम, अमोल मोरे, सतिष सुरडकर, विलास वसु, नितिन शेळके, शिवाजी देव्हडे, रविराज टाले, शे मुजीम शे चांद, विष्णु भुतेकर, उमाकांत पवार, विठ्ठल करवंदे, राजेंद्र खरपास, निवृत्ती मोरे, रमेश इंगळे, मधुकर इंगळे, संतोष वांजोळ, सतिष काळे, गजानन मोरे, म हमीद, रामेश्वर भुतेकर यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
————–
Leave a Reply