BuldanaBULDHANA

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस लागली कामाला!

– आ. लिंगाडे, अ‍ॅड पाटील, उमाळकर, सौ. वनारेंवर विशेष जबाबदारी

बुलढाणा (बाळू वानखेडे) – आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली पाहता, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेसनेही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातही विधानसभा मतदारसंघात मुख्य समन्वयक व सहसमन्वयकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये आ. धीरज लिंगाडे, अ‍ॅड गणेश पाटील, श्याम उमाळकर वर्षाताई वनारे यांच्यावरही जबाबदारी सोपावण्यात आलेली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन उभ्या आहेत. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट यासह इतरांनीही विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक, संपर्क प्रमुख नेमले आहेत. त्याचदृष्टीने काँग्रेसही कामाला लागली आहे. जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघटन मजबूत होण्याच्या दृष्टीने सातही विधानसभा मतदारसंघात मुख्य समन्वयक व सहसमन्वयकांची नियुक्ती दि.२४ जुलैरोजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केली आहे. यामध्ये मेहकर मतदारसंघासाठी मुख्य समन्वयक आ. धीरज लिंगाडे व सहसमन्वयक सुधाकर धमक, सिंदखेडराजा विधानसभेसाठी मुख्य समन्वयक आ. धीरज लिंगाडे, सहसमन्वयक सचिन शिंगणे, चिखली विधानसभा मुख्य समन्वयक प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, सहसमन्वयक शैलेश सावजी, बुलढाणा विधानसभा मुख्य समन्वयक डॉ. अरविंद कोलते, सहसमन्वयक माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. वर्षाताई वनारे, मलकापूर विधानसभेसाठी मुख्य समन्वयक प्रकाश देशमुख, सहसमन्वयक अंबादास बाठे, जळगाव जामोद विधानसभेसाठी मुख्य समन्वयक प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, सहसमन्वयक दिलीपराव जाधव तर खामगाव विधानसभेसाठी मुख्य समन्वयक हाजी रशीदखॉ जमादार तर सहसमन्वयक म्हणून अ‍ॅड हरीष रावळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केली असून, याबाबतची माहिती संबंधित तालुका व शहर अध्यक्षांना कळविली आहे.
——–
विधानसभा निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तरीही चिखली, बुलढाणा, खामगाव हे विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येतील, अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व कामाला लागले आहेत. सद्या तरी राहुल बोंद्रे व दिलीपकुमार सानंदा हेच फिल्डवर सक्रीय दिसत असून, इतर नेत्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे तालुका समन्वयकांच्या नियुक्तीनंतर तरी हे नेते सक्रीय होतील, अशी आशा बळावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!