Breaking newsBuldanaBULDHANAWomen's World

मुलांपेक्षा मुलीच हुशार; तेराही तालुक्यात मुलींचाच टक्का वाढता!

– गुणवत्ता वाढ की सूज? चिंता अन् चिंतनाची!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल काल, २१ मेरोजी दुपारी जाहीर करण्यात आला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९०.४५ टक्के लागला असल्याचे अनिल आकाळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलतांना सांगितले. तेराही तालुक्यांतील निकालावर नजर फिरवली असता, मुलींचाच डंका वाजत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस निकालाची वाढती टक्केवारी पाहता ही गुणवत्ता वाढ आहे की सूज? असा चिंताजनक प्रश्न आपसूकच यानिमित्ताने चर्चिला जात असून, यावर चिंतन होणेदेखील गरजेचे असल्याचे विशेषता सूज्ञ व जाणकार नागरिकांतून बोलले जात आहे.
Maharashtra Class 12 Result 2024 declared: 93.37% students pass, girls  outperform boys | - Times of India
मुलीच चमकल्या.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काल, २१ मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३४ हजार ५६१ विद्यार्थी बसले होते. पैकी ३१ हजार २६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, टक्केवारी ९०.४५ एवढी आहे. यामध्ये विज्ञान शाखेतून नियमीत विद्यार्थ्यांतून १९,५८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, यामध्ये ११,१८५ मुले तर ८, ३९६ मुली यांचा समावेश होता. पैकी १०,८९८ मुले तर ८,२५२ मुली उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलांची टक्केवारी ९७.४३ तर मुलींची टक्केवारी ९८.२८ आहे. कला शाखेतून ५,१९७ मुले व ४,९६० मुलींनी परीक्षा दिली. यामध्ये ३,९५९ मुले तर ४,२९८ मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांचे शेकडा प्रमाण ७६.१७ तर मुलींचे ८६.६५ आहे. वाणिज्य शाखेतून १२६२ मुले तर १२६१ मुली परीक्षेला बसल्या होत्या. पैकी १०८३ मुले तर ११९१ मुली उत्तीर्ण झाले असून, मुलांचे शेकडा प्रमाण ८५.८१ तर मुलींचे ९४.४४ आहे. व्होकेशनल शाखेतून ५४२ मुले तर १६० मुलींनी परीक्षा दिली. पैकी ४३५ मुले व१४१ मुली उत्तीर्ण झाले असून, मुलांचे शेकडा प्रमाण ८०.२५ तर मुलींचे ८८.१२ आहे. टेक्निकल सायन्समधून चार मुलांनी परीक्षा दिली असून, सर्व उत्तीर्ण झाले आहेत. पुनरपरीक्षार्थी विद्यार्थ्यांतून विज्ञान शाखेतून ७३५ मुले तर २५० मुलींनी परीक्षा दिली असून, ४७१ मुले व १४७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण शेकडा प्रमाण ६४.८ तर मुलींचे ५८.८० आहे. कला शाखेतून २९४ मुले व २४२ मुलींनी परीक्षा दिली असून, मुले १६४ तर मुली १६८ मुली उपस्थित उत्तीर्ण झाले आहेत. शेकडा प्रमाण मुले ५५.७८ तर मुलींचे ६९.४२ आहे. वाणिज्य शाखेतून ३८ मुले व २० मुलींनी परीक्षा दिली, पैकी २९ मुले व १६ मुली उत्तीर्ण झाले असून, मुलांचे शेकडा प्रमाण ७६.३१ तर मुलींचे ८० टक्के एवढे आहे. व्होकेशनलमधून १० मुले व ५ मुलींनी परीक्षा दिली असून, सहा मुले व चार मुली उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णचे शेकडा प्रमाण मुले ६० टक्के तर मुली ८० टक्के आहे. एकंदरीत जिल्ह्याचा निकाल ९०.४५ टक्के लागला आहे.
तालुकानिहाय निकाल पाहता, बुलढाणा तालुक्यातून २७५९ मुले तर २०९५ मुलींनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये २५२० मुले तर १९९२ मुली उत्तीर्ण झाले आहेत. मोताळा तालुक्यातील १०८८ मुले तर ७६८ मुलींनी इयत्ता बारावी परीक्षा दिली असून, यामध्ये ८६६ मुले तर ६५४ मुली, चिखली तालुक्यातून २६०८ मुले तर १८ ३६ मुलींनी परीक्षा दिली असून, २४६७ मुले व १७६३ मुली उत्तीर्ण झाल्या. देऊळगावराजा तालुक्यातून ६९७ मुले व ६०२ मुलींनी परीक्षा दिली असून, ६३९ मुले तर ५८३ मुली उत्तीर्ण झाले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातून २०८९मुले व १४५९ मुलींनी परीक्षा दिली असून, १७८६ मुले तर बाराशे ९७ मुली उत्तीर्ण झाल्या. लोणार तालुक्यातून १२९४ मुले व ८५० मुली परीक्षेला बसल्या होत्या, पैकी ११८५ मुले व ७८७ मुली उत्तीर्ण झाल्या. मेहकर तालुक्यातून १८२५ मुले व १५०० मुलींनी परीक्षा दिली. यामध्ये १७०१ मुले व १४४५ मुली उत्तीर्ण झाल्या. खामगाव तालुक्यातील २०५८ मुले १८५४ मुलीनी परीक्षा दिली, यामध्ये १८०८ मुले व १७४९ मुली उत्तीर्ण झाल्या. शेगाव तालुक्यातून ९२२ मुले व ८५६ मुलींनी परीक्षा दिली असून, ८०२ मुले ७९७ मुली उत्तीर्ण झाल्या. नांदुरा तालुक्यातून ८१६ मुले ८९० मुलींनी परीक्षा दिली असून, ६३३ मुले व ७९२ मुली उत्तीर्ण झाल्या. मलकापूर तालुक्यातील १२२६ मुले व १०७४ मुलींनी परीक्षा दिली असून, ९८० मुले व ९५६ मुली उत्तीर्ण झाल्या. जळगाव जामोद तालुक्यातून ९९२ मुले व ८३७ मुलींनी परीक्षा दिली असून, ८९८ मुले व ७८९मुली पास झाल्या तर संग्रामपूर तालुक्यातून ८९३ मुले व ६७५ मुलींनी परीक्षा दिली असून, ७६२ मुले व ६१४ मुली उत्तीर्ण झाल्या, अशी माहिती अनिल आकाळ शिक्षणाधिकारी माध्यमिक व जगन मुंढे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली. उत्तीर्णची एकंदर टक्केवारी पाहता, यामध्ये मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी वाढती दिसून येत आहे.


वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी पाल्याला ६० ते ६५ टक्के गुण मिळाल्यावर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडायची. त्यामुळे त्याला शिक्षणात आणखी हुरुप यायचा. परंतु दिवसेंदिवस शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येत आहे. हा बदल विद्यार्थ्यांकडेच झुकल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुण व कौशल्य याचा विकास व्हावा म्हणून आता लेखी व तोंडी परीक्षादेखील घेतल्या जाते. एकंदरीत अगदी शिक्षण मंडळापासून तर शाळेपर्यंत सर्वांचा कल जास्तीत जास्त विद्यार्थी कसे, पास होतील. पर्यायाने शाळेचा निकाल कसा वाढेल, याकडेच दिसून येतो. हे खरे असले तरी आता विद्यार्थ्याला ८० टक्के गुण मिळाले, तरीही विशेषता पालकांचे समाधान झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ही गुणवत्ता वाढ आहे की, गुणांची सूज आहे? यावर चिंता व्यक्त होत असताना चिंतन होणेही गरजेचे असल्याचे आता सूज्ञ व जाणकार नागरिकांतून  बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!