Breaking newsHead linesSINDKHEDRAJA

रेतीचोरट्यांविरोधात महसूल पथकाच्या धडाकेबाज कारवाया!

– किनगावराजाच्या ठाणेदारांनी माजी सरपंचाचे टिप्पर पकडले; तर चिंचखेड येथे वाळूतस्करांच्या बोटी, पाईप्स केले नष्ट!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे व तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी वाळूतस्करांविरोधात जोरदार मोहिम उघडली असून, त्यांच्यावर लचकेतोड कारवाया सुरू आहेत. त्यातच किनगानराजाचे ठाणेदार यांनीही वाळूतस्करांवर कारवाई करून जरब निर्माण केली आहे. एका माजी सरपंचाचे टिप्परच त्यांनी जप्त करून पोलिस ठाण्यात लावले आहे. महसूल पथकाच्या या धडक कारवायांनी रेतीचोरांचे चांगलेच धाबे दणाणले असून, लाखो रुपयांच्या रेतीसह वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच, चिंचखेड येथे पूर्णा नदीच्या पात्रातून रेतीचोरी करणारे बोटी, पाईप्स व इतर साहित्य महसूल पथकाने नष्ट करून रेतीचोरांना चांगलाच दणका दिला आहे.

सविस्तर असे, की सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवणी व हिवरेखेड येथील माजी सरपंच यांचे दोन ब्रासचे अवैध रेतीउपसा करणारे टिप्पर किनगावराजाचे दबंग ठाणेदारांनी पकडून सादर वाहन हे पोलिस स्टेशनमध्ये जमा करून पुढील कारवाई सुरू आहे. तसेच, आडमार्गाने जाणारे चार ब्रासची अवैध रेती वाहतूक करणारे वाहन आडगावराजा उमरद येथे पकडून भरारी पथकाकडून किनगावराजा पोलिस स्टेशनमध्ये जमा करून पुढील कारवाई करण्यात येईल. दिनांक २० मेरोजी रात्री ११ वाजता रामेश्वर पुंजाराम देशमुख रा. सोयंदेव ता.सिंदखेडराजा यांच्या मालकीचे वाहन टिप्पर क्र. एमएच २८ बीबी ५२५४ हे चार ब्रास अवैध रेती वाहतूक करतांना आढळून आल्यावरून सदर वाहनांवर कारवाई करून पोलिस स्टेशन किनगांवराजा येथे अटकावून ठेवण्यात आले आहे. सदर कारवाई ही संतोष गायकवाड मंडळ अधिकारी, श्रीमंत पांडव तलाठी, ब्रम्हदेव साळवे तलाठी व विष्णू थोरात तलाठी यांच्या महसूल पथकाने केली. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. तसेच, जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून खडकपूर्णा धरणामध्ये मौजे चिंचखेड येथे वाळूचे अवैध उत्खनन करणार्‍या तीन बोटी व त्यांचे साहित्य आणि पाईप्स नष्ट करण्यात आले असून, सदरील कामगिरी परीविक्षाधीन नायब तहसीलदार देऊळगाव राजा श्रीमती. प्रांजल पवार यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी रामदास मांटे, मंडळ अधिकारी ईप्पर, मंडळ अधिकारी वायडे व तलाठी सरिता वाघ, ज्योती लोखंडे, पी. डी. बुरकुल, पी. टी. जायभाये, एस. एस. वाकोडे, एस. टी. हांडे, एम. के. जारवाल, एस. ए. देशपांडे, आकाश खरात, तेजस शेटे, कोतवाल विठ्ठल हरणे, कोतवाल आकाश माघाडे, वाहन चालक एन. बी. उबाळे व वाहन चालक चव्हाण यांनी पार पाडली.


महसूल पथकाने रेतीतस्करांच्या बोटी नष्ट केल्यात.

शिंदी ते साखरखेर्डा रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले, टिप्पर व रेती जप्त

अवैध रेती वाहतूक करणार्‍या वाहनांना रोज कुठे ना कुठे सिंदखेडराजा तालुक्यामध्ये पकडल्या जात असून, उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रेती वाहतूक करणार्‍या वाहन मालकाला मात्र चांगलाच धक्का बसत आहे. २१ मेच्या रात्री १० वाजून २० मिनिटांनी मध्यरात्र ही झाली नसताना शिंदी ते साखरखेर्डा रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर शिंदी येथून साखरखेर्डा मार्गाने जात असताना महसूल पथकाने हे टिप्पर पकडले. टाटा कंपनीचे हे टिप्पर असून, सदर टिप्पर सिंदखेडराजा तालुक्यातील तांदूळवाडी येथील मनोज चेके यांचे असल्याचे समजते. टिप्परमध्ये दोन ब्रास रेती आढळून आली असून, रेती वाहतूक परवाना चौकशी केली असता चालकाकडे आढळून आला नाही. त्यामुळे सदर टिप्पर व रेती जप्त करण्यात आली असून, टिप्पर साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे. सदर कारवाई संजय शिंगणे तलाठी साखरखेर्डा व लखन राजपूत तलाठी शिंदी यांनी केली असून अवैध रेती वाहतूक करणार्‍यांचे मात्र चांगलेच दमछाक झाली आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!