Breaking newsCrimeHead linesMaharashtraPuneWorld update

जामीन रद्द! अल्पवयीन आरोपीला रिमांड होममध्ये ठेवण्याचा निर्णय!

– पोर्शे कारने दोघा आयटीएन्सना चिरडल्याचे प्रकरण; बिल्डर विशाल अग्रवालसह तिघांना २४ तारखेपपर्यंत पोलीस कोठडी
– कोर्ट आवारात आरोपी विशाल अग्रवालवर शाईफेकीचा प्रयत्न!

पुणे (विशेष प्रतिनिधी) – कल्याणीनगर भागातील पोर्शे कारने अल्पवयीन व मुजोर आरोपीने दोघा आयटी इजिनिअर तरूण-तरूणीला चिरडून ठार मारल्याप्रकरणी बालहक्क न्याय मंडळाने बुधवारी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याला ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठवले. आरोपी हा एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असून, त्याने १८ मेरोजी रात्री दारूच्या नशेत दुचाकीला त्याच्या पोर्श कारने धडक दिली. या अपघातात एक आयटी इंजिनियर मुलगा आणि बाईक चालवणार्‍या मुलीचा मृत्यू झाला होता. आरोपीला बाल न्याय मंडळाने काही अटींसह १५ तासांच्या आत सोडले, मात्र बुधवारी त्याला पुन्हा एकदा बोलावण्यात आले. दरम्यान, बिल्डर विशाल अग्रवालला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली असून, त्याच्यासह तिघांना न्यायालयाने २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर आज विशाल अग्रवालवर कोर्ट आवारातच शाईफेकीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती.

शहरातील कल्याणीनगर येथे शनिवारी (१८ मे) रात्री एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने महागड्या पोर्श कारने एका दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार आणि दुचाकीवरून प्रवास करणार्‍या तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. रविवारी (१९ मे) दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी या आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, आरोपी अल्पवयीन (साडेसतरा वर्षे) असल्यामुळे न्यायालयाने सरकारी वकिलांची मागणी फेटाळत त्याचा जामीन मंजूर केला होता. तसेच आरोपीला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगितले होते. पाठोपाठ त्या मुलाला वाहन चालवायला देणार्‍या त्याच्या वडिलांना अटक करण्याचे आदेशही दिले होते. आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी मंगळवारी छत्रपती सभाजीनगरमधून अटक केली. बिल्डर विशाल अग्रवालला पोलिसांनी अटक केल्यानंतर, पुणे सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर सरोदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सरोदे म्हणाले, ‘या प्रकरणात मुलाचे वडील आरोपी आहेत. त्यांनी वडिलांची भूमिका व्यवस्थित पार पाडली नाही. कारवर नंबर नसताना, मुलाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही त्याला कार चालवायला दिली. १८ वर्षे वय झालेले नसूनही त्याला पबमध्ये पाठवणे चांगल्या पालकांचे लक्षण नाही. बाल न्याय हक्कानुसार आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष केले आहे, तसेच तुम्ही मुलावर नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे कोर्टाने २४ मेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.’ अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह बारचालक (जिथे आरोपीने मद्यप्राशन केलं होतं) आणि बारच्या व्यवस्थापकांनाही यांनाही तुरुंगात पाठवण्यात आले आहे. हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत जुवेनाईल बोर्डाच्या निर्णयाविरोधात पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. या आदेशाचा आढावा घेण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना जुवेनाईल बोर्डाकडे जाण्याचे निर्देश दिले होते. यानंतर बुधवारी पोलिसांच्या अर्जावरून मंडळाने आरोपींना पुन्हा बोलावले. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीलाही चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, बिल्डर अग्रवाल याला न्यायालयातून नेत असताना काही लोकांनी पोलिस व्हॅनवर शाई फेकली आणि घोषणाबाजी केली.

https://x.com/i/status/1793302229291528683


या भयावह अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी नव्या कलमाची वाढ केली आहे. त्यानंतर अल्पवयीन आरोपी मुलाने कोर्टात हजेरी लावली. मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर १८५ कलमाच्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी त्याच्यावर कलम ३०४ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरुन न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. या मुलाला दुपारी १२ वाजता बालहक्क कोर्टासमोर हजर करण्यात आले होते, तेथे त्याची रिमांड होममध्ये रवानगी करण्यात आली.

https://x.com/i/status/1792104844846899399

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!