Breaking newsCrimeHead linesPuneWorld update

‘बिल्डर का बेटा इसलिए मिली बेल’!

– डीप फेक तंत्रज्ञान वापरून व्हिडिओ बनवला गेल्याचा पोलिसांना संशय

पुणे (विशेष प्रतिनिधी) – पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणी तळपायाची आग मस्तकात जाईल, असा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एका रॅप साँगच्या माध्यमातून एक मुलगा ‘बिल्डर का बेटा इसलिए मिली बेल, फिर से दिखाऊंगा सड़क पर खेल’, म्हणत या नृशंस कृत्याचे जणू समर्थनच करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अल्पवयीन आरोपीने जामीन मिळाल्यानंतर तयार केल्याचे चर्चिले जात असल्याने अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा संतप्त झालेला आहे. तर, पुणे पोलिसांनी हा व्हिडिओ एआय किंवा डीप फेक तंत्राद्वारे तयार करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला असून, या व्हिडिओची चौकशी सुरू केलेली आहे.

बिल्डर बापाच्या पैशावर मजा मारून, दोन निष्पापांचा जीव घेऊन व्यवस्थेच्या परवानगीने एका दिवसांत जामीन घेतल्यानंतर पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या नावाने एक रँप साँग व्हायरल होत आहे. एक दिन में मुझे मिल गई बेल, फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल, अशा प्रकारची भाषा संबंधित मुलगा व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. दोन निष्पापांचा जीव घेऊनही त्याच्या चेहर्‍यावर अस्वस्थतेचा लवलेशही दिसत नाही, उलट त्याच्या ठायी ठायी पक्का माजोरडेपणा ठासून भरलेला दिसत आहे.


रॅपमधून शिवीगाळ…..

करके बैठा मै नशे…इन माय पोर्शे
सामने आया मेरे कपल, अब वो है निचे
साऊंड सो क्लिशे.. सॉरी गाडी चढ गई आप पे
१७ की उमर पैसे खूब है मेरे बाप के पास
एक दिन में मुझे मिल गई बेल, फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल
प्लेइंग केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार
चार यार मेरे साथ फाड देंगे गां**


रविवारी पहाटे पार्टी करुन, दारु पिऊन सुसाट जाणार्‍या या बिल्डरपुत्राने एक तरूण व युवतीला उडवले. त्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्याला बालहक्क न्याय मंडळाने आधी तात्काळ जामीन मंजूर केला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा कोर्टात धाव घेऊन, पुन्हा बाल न्यायालय बोर्डात गेले. त्यानंतर बाल न्यायालय बोर्डाने या बिल्डरपुत्राचा जामीन रद्द करुन १४ दिवस अर्थात ५ जूनपर्यंत बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, हे प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांकडून दडपवले गेल्याचा आरोप केला जात असून, यावरून आता राजकारणदेखील जोरात सुरू आहे. पुण्यातील कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण उचलून धरलेले आहे. त्यांनी याप्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी केली, असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको. कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टाने १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे. जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दाबले गेले होते. आता खरे या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आहे. त्याची सुरुवात पोलीस कमिश्नर यांच्यापासून करायला हवी’, असे रवींद्र धंगेकर म्हणाले. तर, या सर्व प्रकरणात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे कुठे आहेत, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
———–

https://x.com/i/status/1793655346386686215

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!