बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन येथे सम्राट अशोककालीन बौद्ध स्तूप अवशेष उत्खननात आढळले आहेत. या पवित्र व ऐतिहासिक ठिकाणी २३ मे गुरुवार रोजी बुद्ध जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त बुद्ध वंदना , जाहीर व्याख्यान बुद्धभीम गीतासह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
यानिमित्त 23 मे रोजी सकाळी दहा वाजता भंते संघपाल हे बुद्ध वंदना घेतील. सकाळी अकरा वाजता प्रा. प्रियदर्शी खोब्रागडे यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम राहतील. प्रास्ताविक भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समिती उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता राजदत्त अलोणे, संचालन पत्रकार महेंद्र बोर्डे सहसचिव भारतीय स्तूप लेणी संवर्धन समिती तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल खंडारे सचिव भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समिती हे करणार आहेत. दुपारी एक वाजता प्रसिद्ध गायक मिलिंद डोंगरदिवे यांचा भीम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. समारोप व सरणत्तय जी एन ब्राह्मणे माजी गटशिक्षणाधिकारी तथा कोषाध्यक्ष भारतीय स्तुप व लेणी संवर्धन समिती यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी स्तुपाच्या अवशेषाची पोस्टर प्रदर्शनी देखील भरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.