– गोरगरीब आदिवासी मुले घेत आहेत उच्चदर्जाचे मोफत शिक्षण
शहादा (ब्रेकिंग महाराष्ट्र) – राज्य सरकारने अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, शिवाय शिक्षण दर्जेदार मिळावे. हा दृष्टिकोन समोर ठेवून अनेक शासकीय निवासी शाळा सुरू केल्या. पण पाहिजे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणात्मक शिक्षण मिळावे म्हणून केंद्र शासनाने शाळा सुरू केल्या. पर्यायाने प्रशासकीय यंत्रणा उत्तम प्रकारे राबवत असल्याने केंद्र शासनाच्या प्रयोग यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात थंड हवेचे ठिकाण असलेले मुख्य पर्यटनस्थळ तोरणमाळ या ठिकाणी केंद्र शासनाची भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल निवासी शाळा सध्या विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने मुख्य आकर्षण ठरली आहे.
ही शाळा सन २०१७ मध्ये नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. पण शासनाच्या दृष्टिकोन दुर्गम भागातील सर्वसामान्य आदिवासी बांधवांना शिक्षण कसे मिळेल, हा होता. म्हणून सदरची शाळा तोरणमाळ तालुका धडगाव याठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. साधारणत तीन ते चार वर्ष अद्यावत असे बांधकाम सुरू होते. सर्व सोयींनी युक्त अशी शाळा जानेवारी २०२२ मध्ये सुरू झाली. सुरुवातीला ५०२ विद्यार्थ्यांची संख्या होती.हळूहळू गुणवत्ता बघता आता ही संख्या १४८० पर्यंत पोहोचली आहे. उत्तम दर्जाचे शिक्षक जे अहोरात्र मेहनत घेऊन विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र शाळेच्या या अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व्यायामाची व्यवस्था खेळण्यासाठी भव्य क्रीडांगण, २४ तास पाण्याची सोय, मुलं व मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी आठशे विद्यार्थी संख्या असलेले वस्तीगृह. ग्रंथालय प्रयोगशाळा भव्य अशी इमारत आहे. धडगाव तालुक्यातील तसेच अतिदुर्गम भागातील शेकडो विद्यार्थी येथे आनंदाने शिक्षण घेत आहेत.प् ाालकांचा कल या शाळेकडे दिसून आला आहे. विशेष म्हणजे वेळोवेळी इथे पालकांचे मेळावे आयोजित केले जात असतात. त्यात त्यांच्या पाल्याची शैक्षणिक गुणवत्तेबाबत माहिती दिली जाते. भविष्यात या माध्यमातून मोठे शैक्षणिक केंद्र होईल, असा अंदाज आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करणे चांगल्या वातावरणात शिक्षण देणे हा दृष्टीकोन या शाळेच्या असून विद्यार्थ्यांना गणवेश शैक्षणिक साहित्य शाळेमार्फत पुरवली जाते. वेळोवेळी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. विद्यार्थ्यांना चार वेळा सकस आहार दिला जातो. येत्या काळात विद्यार्थी संख्या सतराशे पर्यंत पाऊस येण्याच्या आमच्या माणस आहे, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक सुधीर पाटील यांनी दिली.
आम्ही घरीच होतो. गुरे चारण्याचे काम करीत होतो. आमच्या परिसरात शाळा लहान होत्या. शाळेतून आम्ही घरी पळून येत होतो. मात्र तोरणमाळ येथील या शाळेत चांगल्या प्रकारे शिक्षण आम्हाला मिळत असून आम्ही आनंदित आहोत. व्यसनापासून हमी लांब गेलो. सर्व प्रकारच्या सुविधा मिळत असल्याने सर्व विद्यार्थी आनंदित असून, डॉक्टर देखील येत असतात. उच्च शिक्षण घेऊन आमच्या आई वडिलांचे स्वप्न साकार करणार अशा प्रतिक्रिया बदीबारी तालुका धडगाव येथील विद्यार्थी जयसिंग पावरा व विद्यार्थिनी सरिता पावरा यांनी दिली.
————–