सिंदखेडराजा (अनिल दराडे) – बायर कंपनीमध्ये सेक्युरीटी गार्ड असलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी याच कंपनीच्या सुरक्षा गार्ड पुरविणार्या आयएसएस कंपनीचा मॅनेजर उध्दव घुले रा. संभाजीनगर, व सचिन कांबळे रा. पुणे यांच्याविरोधात देऊळगावराजा पोलिस ठाण्यात काल, दि. ३०एप्रिलरोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे, की २९ वर्षीय विवाहित महिला बायर कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्डचे नोकरीवर असताना सिक्युरिटी आयएसएस कंपनीचा मॅनेजर उध्दव घुले व सचिन कांबळे यांनी फिर्यादी विवाहित महिलेला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन कंपनीमध्ये तसेच महिलेच्या राहत्या घरी जाऊन वारंवार तिला शारीरिक सुखाची मागणी करुन दोन्ही आरोपींनी तिला वाईट उद्देशाने पकडून विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी उध्दव घुले व सचिन कांबळे यांच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या ५४,३५४ (अ),५०६, ३४ कलमाअन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल जायभाये करीत आहे.