AalandiPachhim Maharashtra

संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त देहू, आळंदीत भाविकांची गर्दी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : देहू येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत तसेच आळंदीतदेखील भाविकांची संत तुकाराम महाराज मंदिरात श्रींचे दर्शनास हरिनाम गजरात भाविकांनी गर्दी केली आहे. देहूत बुधवारी ( दि. २७ ) लाखो भाविकांचे उपस्थित संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा साजरा होत आहे. देहूत इंद्रायणी नदी घाट परिसरासह श्रीक्षेत्र देहूत विविध ठिकाणी बीज सोहळयानिमित्त हरिनाम गजरात धार्मिक कार्यक्रम परंपरेने होत आहे. कीर्तन, प्रवचन, गाथा भजन, गाथा पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांसह अन्नदान मोठ्या प्रमाणात होत आहे. मंदिरात भाविकांनी रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा – माऊली तुकाराम नामजयघोष करीत भाविकांनी दर्शन घेत जयघोष केला.

इंद्रायणी नदी घाटावर, संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर आणि श्री वैकुंठ गमन स्थान मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली असून तीर्थक्षेत्री स्नान माहात्म्य जोपासले जात आहे. देहू नगरपंचायतीने विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता प्रभावी पणे उपलब्ध करून दिल्या आहेत. देहूत सीसीटीव्हि यंत्रणा तसेच पब्लिक ऍड्रेस सिस्टएम प्रभावी पणे विकसित केली असून भाविक नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
यासाठी देहू नगरपंचायत पदाधीकारी, प्रशासन, पोलीस प्रशासन आणि देहू देवस्थान यांनी सुसंवाद ठेवून नियोजन केले आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भाविक आणि मंदिर परिसरात सुरक्षितता राहण्याचे दृष्टीने पोलीस तसेच पोलीस मित्र कार्यरत आहेत. घाटावर तसेच मंदिरात भाविकांनी रांगा लावून श्रीचे दर्शन घेतले. देहू परिसरात महिला, पुरुष भाविकांचे गर्दीने रस्ते फुलले होते. मंदिरात प्रभावी दर्शन व्यवस्थेने भाविकांचे सुलभ दर्शन झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. इंद्रायणी नदी घाटावर देखील भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात भाविकांनी केल्या.
भाविक मिळेल त्या वाहनाने तसेच खाजगी वाहनाने ये-जा करताना दिसत होते. पुणे महानगर परिवहन सेवेने देखील भाविकांची व्यवस्था केली होती. यात राज्य परिवहन सेवेने प्रवासी बस सेवा उपलब्द्ध करून दिल्या होत्या. ध्वनिक्षेपकांवरून महिलांना चोरांपासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. देहू, आळंदी, पंढरपूर देव दर्शन करून काही भाविक यात्रा करीत असतात. या वर्षीही राज्यभरातून भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांना कमी वेळेत सुरक्षित, सुरळीत दर्शन व्यवस्था आणि भाविकांची सुरक्षा यावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे कनिष्ठ अभियंता संघपाल गायकवाड यांनी सांगितले. शांतता आणि प्रभावी पोलीस बंदोबस्त यासाठी पोलीस आयुक्तालयाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

होलिकोत्सव दिनी इंद्रायणी नदी घाटावर दैनंदिन इंद्रायणीच्या महाआरती इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट चे वतीने अध्यक्ष अर्जुन मेदनकर, अनिल जोगदंड, नितीन ननवरे, दिनकर तांबे, उपाध्यक्ष राहुल चव्हाण, गोविंद ठाकूर, सेवक महारुद्र हाके आदींसह भाविकांचे उपस्थितीत धार्मिक मंगलमय वातावरणात झाली. तात्पुरवे इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!