LONAR

लाईनमनचा लोणार उपविभाग येथे गुणगौरव

बिबी (प्रतिनिधी) – लाईनमन दिनानिमित्त लोणार उपविभाग कार्यालय येथे लाईनमन यांचा गुणगौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर असे, की लोणार उपविभाग येथे ४ मार्च हा लाईनमन दिवस म्हणून साजरा करण्यात आला. महावितरण कंपनीने नव्यानेच कंपनीचा कणा म्हणून समजल्या जाणार्‍या लाईनमन यांचा गुणगौरव करावा, म्हणून ४ मार्च हा दिवस पूर्ण महाराष्ट्रभर लाईनमन दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरले, व या दिवशी त्यांचा सत्कार करून पुष्पगुच्छ देऊन सर्व कर्मचार्‍यांचे स्वागत करण्यात आले. नंतर सर्व कर्मचारी यांच्यासाठी भोजन ठेवण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील सर्व कर्मचारी हजर होते. प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकारी अभियंता वडतकर साहेब, राजगुरू साहेब, कट्टमवार साहेब, टेकाळे साहेब व नागरे, संजय खार्डे, चव्हाण साहेब, देशमुख मॅडम, पाचपोर साहेब, विशाल वानखेडे, केदार साहेब, मुंडे साहेब, कराड साहेब, नाना पिसे, नाथा राजगुरू, दीपक साळवे, राहुल माळवदे हे सर्व कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!